कोणताही ऋतू असो, त्वचेची काळजी घेतलीच पाहिजे. असं असलं तरी प्रत्येक वेळी पार्लर किंवा महागडी ट्रिटमेंटच घेतली पाहिजे असं काही नाही. तुम्ही घरच्या घरीही फेशीअल स्क्रब करुन त्वचा चमकवू शकता. कंस? चला पाहुयात. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तांदळाचं स्क्रब, हो अगदी घरच्या घरी तयार होतं हे, तसेच चांगला रिझल्टही देतं. चला तर पाहुयात त्वचेवर चमक येण्यासाठी तांदळाचं स्क्रब कसं तयार करायचं.
तांदळाच्या पिठाचे स्क्रब
सर्वात आधी तुम्हाला एका भांड लागणार आहे, त्यात सुरवातीला साधारण ५ चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात थोडे पाणी घालून चांगले मिसळा. हे मिक्स झाल्यावर या मिश्रणाने त्वचा स्क्रब करा. हा स्क्रब तुम्ही १० मिनिट ठवून नंतर त्वचेवरुन काढून टाकू शकता. आठवड्यातून दोनदा या स्क्रबचा वापर केल्याने चेहऱ्यावर चमक येते.
तांदळाचे पीठ आणि दूध
सर्वात आधी एका भांड्यात ४ चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात थोडे दूध घाला. आता याने त्वचा स्क्रब करा. यानंतर, मसाज करताना त्वचा स्वच्छ करा. हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून दोनदा त्वचेसाठी वापरू शकता.
कोरफड आणि तांदळाचे पीठ
यामध्येही सुरुवातीला एका भांड्यात ५ चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात एलोवेरा जेल घाला. त्यात थोडेसे पाणी मिसळून त्वचेची मालिश करू शकता. या स्क्रबने त्वचेला मसाज करा आणि काही मिनिटांनी त्वचा स्वच्छ करा.
हेही वाचा >> चहा-कॉफी पिताना जीभ भाजलीय? हे घरगुती उपाय करा, मिळेल ५ मिनिटांमध्ये आराम
तांदळाचे पीठ आणि दही बॉडी स्क्रब
एका भांड्यात ५ चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात थोडं दही घाला. हे मिश्रण त्वचेवर आणि मानेवर लावा आणि काही वेळ मालिश केल्यानंतर ते काढून टाका. या राइस स्क्रबमुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.