आजकाल केसांच्या समस्यांमुळे प्रत्येकजण चिंतेत आहे. योग्य काळजी न घेतल्याने केस खराब होऊ लागतो आणि नंतर ते आतून कोरडे होऊन तुटायला लागतात. याशिवाय, टाळू कोरडा पडल्यामुळे कोंड्याची समस्या वाढते आणि नंतर केस गळू लागतात. तसेच कोरड्या केसांमुळे केस फुटतात आणि नंतर खराब दिसू लागतात. तुम्हालाही अशा केसांच्या समस्या जाणवत आहे का? असे तर त्यांची वेळीच योग्य काळजी घ्या. तुम्हाला केसांच्या समस्येतून सुटका हवी असेल तर तांदळाच्या पिठापासून बनवलेला हा हेअर मास्क केसांना लावा. कोरफड आणि तांदळाच्या पिठाचा हेअर मास्क लावल्याने तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. कोरफड आणि तांदळाच्या पिठाचा हेअर पॅक कसा बनवायचा आणि लावण्याची पद्धत आणि फायदे जाणून घेऊया

या २ गोष्टी तांदळाच्या पिठात मिसळा आणि नंतर केसांना लावा

साहित्य

  • तांदळाचे पिठा
  • कोरफड
  • नारळ तेल

हेअर मास्क कसा बनवायचा आणि लावायचा

  • एका पॅनमध्ये थोडे गरम पाणी ठेवा.
  • त्यात थोडे तांदळाचे पिठ टाकून उकळवा.
  • त्यात कोरफड जेल किंवा गर घाला.
  • सर्वकाही शिजवा आणि गाळून घ्या.
  • गाळल्यानंतर त्यात थोडे खोबरेल तेल टाका.
  • मिक्स केल्यानंतर ते थोडे थंड होऊ द्या आणि केसांना लावा.
  • हलक्या हातांनी मसाज करा आणि ४० मिनिटे तसेच सोडा.
  • यानंतर केस धुवा.

हेही वाचा –लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवणापूर्वी की जेवणानंतर?

How does Set dosa differ from Benne dosa (1)
सेट डोसा हा बेन्ने डोसापेक्षा वेगळा कसा आहे? कोणता डोसा आहे आरोग्यदायी? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kartik Aaryan
डिओड्रंटचा वापर करून ‘या’ अभिनेत्याने जाळले होते बहिणीचे केस; आईनेच केला खुलासा
Anand Mahindra React on Dosa Printing Machine
फक्त मशिनमध्ये टाकायचं पीठ, मग कुरकुरीत गरमागरम डोसा छापून तयार; पाहा आनंद महिंद्रांनी शेअर केलेला VIRAL VIDEO
How To Make Egg Fry
How To Make Egg Fry: भुर्जी पेक्षाही टेस्टी! १५ ते २० मिनिटांत बनवा ‘अंडा फ्राय’; लहान मुलंही आवडीने खातील ‘ही’ रेसिपी
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी

कोरफड आणि तांदळाच्या पिठाचा हेअर मास्क लावण्याचे फायदे (Rice flour aloevera hair mask benefits)

केसांना मिळेल पोषण

कोरफड आणि तांदळाच्या पिठाचा मास्क केसांना लावण्याचे अनेक प्रकारे फायदे आहे. परंतु सर्व प्रथम ते केसांना आतून मॉइश्चरायझ करते आणि नंतर टाळूमध्ये रक्ताभिसरण गतिमान करते. याशिवाय केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस लांब आणि दाट होतात.

केसांना मॉइश्चराइझ केले जाईल

केसांच्या फाटे फुटण्यासा समस्येवर तांदूळ कोरफडीचा हेअर मास्क खूप फायदेशीर आहे. हे लावल्याने केसांना सुरवातीपासून शेवटपर्यंत मॉइश्चरायझेशन मिळते आणि नंतर स्प्लिट एंड्सच्या समस्येपासून सुटका मिळते.

हेही वाचा – हेअर परफ्यूम आणि सिरमने केसांचे खरंच नुकसान होते का? वाचा तज्ज्ञांचे मत

केस रेशमी आणि मुलायम होतील

कोरड्या केसांच्या बाबतीत तांदूळ कोरफड हेअर मास्क लावू शकता जे केसांचा पोत सुधारण्यास उपयुक्त आहे. यामुळे केस रेशमी आणि सुंदर होतात. ते त्वचेला हायड्रेट करते आणि नंतर केसांना आतून पोषण देते. यामुळे केस निरोगी होतात आणि त्यांचा पोत सुधारतो आणि कोरड्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळते.