Rice & Weight Gain : सध्या बैठी जीवनशैली आणि पोषक आहार न घेतल्यामुळे वजन वाढीच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक जण वजन वाढू नये किंवा वाढलेले वजन कमी करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. एवढंच काय तर काही लोक वजन वाढण्याच्या भीतीने भात खाणे टाळतात. तुम्ही सुद्धा वजन वाढू नये म्हणून भात खाणे टाळता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डॉ. मानसी मेहेंदळे भात खाण्याची योग्य पद्धत सांगत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये डॉ. मानसी मेहेंदळे सांगतात, “भात खाऊन वजन वाढतं का? तर हो. भातामध्ये खूप कार्ब्स असतात. स्टार्च असतात. भातामुळे वजन वाढणार आहे. पण भात जर तुम्ही योग्य प्रमाणात घेतला, त्याचे प्रमाण योग्य ठेवले तर वजन वाढत नाही. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, लाल तांदूळ घेऊ का ज्यामुळे वजन वाढणार नाही पण दोघांचा ग्लायसेमिक इंडेक्स सेम आहे. त्या दोन्ही तांदळाची गुणवत्ता वेगवेगळी असते. त्याचे पोषण मुल्ये वेगवेगळे असतात, त्याने फरक पडतो.फायबर कशामध्ये जास्त आहे त्यामुळे पचन अधिक सोपे होते.”

Amla kadha benefits
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा खरंच फायदेशीर आहे का?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
do really Nagpur is better than Mumbai
Video : खरं मुंबईपेक्षा नागपूर चांगलं आहे का? राजधानी व उपराजधानी, कोणते शहर उत्तम? नेटकरी स्पष्टच बोलले…
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट
poor children collected food
‘जेव्हा पोटातली भूक मर्यादा ओलांडते…’ त्यांनी खरकटं अन्न गोळा करून असं काही केलं… VIDEO पाहून व्हाल भावूक

हेही वाचा : VIDEO: “हे कोल्हापूर हाय भावा” धनंजय पोवरच्या आगमनाला गावात खतरनाक नियोजन; खास बिगबॉसच्या पॅटर्नमध्ये होणार राडा

त्या पुढे सांगतात, “भात खाताना अनेक लोकांना वाटतं की त्याबरोबर दुध घ्यावं, दही घ्यावं. नक्की घ्या. जेव्हा आपण रात्री दही भात घेतो, दुध भात घेतो कारण त्यामुळे आपल्याला शांत झोप येते कारण दह्यामध्ये व्हिटॅमिन बी१२ असते. मेलाटोनिन नावाचा हार्मोन स्त्राव होतो. त्यामुळे शांत झोपायला मदत होते. भात आपण खाल्ला पाहिजे पण त्याचबरोबर तुम्ही काय घेता, जर तुम्ही काजू घेतले, किंवा असे पदार्थ घेतले की ज्याचे कॅलरी जास्त आहेत तर तुमचे वजन वाढेन पण उघडा भात शिजवला आणि त्यावर येणारी पेस्ट जर तुम्ही काढून टाकली तर वजन वाढत नाही. बघा, कोकणी माणूस भरपूर भात खातो तरी सडसडीत असतात. साउथ इंडियन लोकं भरपूर भात खातात पण सडसडीत असतात. त्यासाठी आधी तांदुळ परतून घ्या आणि त्यानंतर त्याचा भात लावायचा म्हणजेच तुमचं वजन वाढणार नाही.”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : पुणेकरांनी हद्दचं केली राव! रस्ता ओलंडण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांनी थेट दुभाजक तोडला, Video Viral

tanviherbals_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भात खाल्ल्याने वजन वाढत का ?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरं आहे. भात खाल्ला की वजन वाढत नाही. तो योग्य रितीने केला की लवकर पोचतो. गोंदिया जिल्हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. आमच्या आहारातील प्रमुख अन्न भात आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली. धन्यवाद”

Story img Loader