निरोगी शरिरासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. यासाठी संतुलित आहार घेतला पाहिजे. त्याने शरिराला योग्य प्रमाणात खनिज, जीवनसत्वे, प्रथिने मिळतात. तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य पद्धतीने जेवले पाहिजे. योग्य पद्धतीने जेवल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. जेवन करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याबाबत आज आपण जाणून घेऊया.
१) अन्न चावून खा
काही लोक जेवताना घाई करतात. अन्न पदार्थ अनेकवेळा चावून खात नाही. त्यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. आयुर्वेदानुसार अन्न नेहमी चावून खाल्ले पाहिजे. असे केल्याने अन्न लवकर पचते आणि शरिराला अन्न पदार्थातील पोषक तत्व मिळतात.
(Strong bones : हाडांना द्या बळकटी, कॅल्शियमसाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन)
२) जेवताना पाणी पिऊ नये
आयुर्वेदनुसार जेवताना पाणी पिणे टाळावे. याने अन्न पचनाची गती मंदावते. तसेच जेवताना पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या होऊ शकतात. जेवनाच्या ४० मिनिटांअगोदर आणि नंतर पाणी पिऊ नये.
३) जमिनीवर बसून जेवन करा
आयुर्वेदनुसार जमिनीवर बसून जेवन केल्याने अन्न पदार्थांचे योग्य प्रकारे पचन होते. याने शरिराला सर्व पोषक तत्व मिळतात. त्यामुळे कधीही उभे राहून जेवण करू नका.
(मुलांना आहारात द्या ‘हे’ पौष्टिक पदार्थ, डोळ्यांची दृष्टी वाढण्यात होईल मदत)
४) हवामानानुसार अन्न असावे
आयुर्वेदनुसार हवामानानुसार जेवण करा. असे केल्याने अनेक आजार आपोआप दूर होतील. उष्णता असताना हल्के जेवन केले पाहिजे. त्याचबरोबर, थंड पदार्थांचे अधिक सेवन टाळले पाहिजे. हिवाळ्यात गोड, आंबट आणि शरिराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचे अधिक सेवन केले पाहिजे. थंडीत शिळे अन्न खाऊ नये.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)