लखनऊ : डोळे आणि पाय सतत सुजत असतील तर ते क्रोनिक मूत्रिपड विकाराचे (सीकेडी) लक्षण आहे, असे मत लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूत्रिपड विकार निवारण दिनानिमित्त किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये मूत्रिपड विकार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वैद्यकीय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डोळे, पाय सतत सुजणे, अशक्तपणा, कधीमधी डोकेदुखी व उलटी होणे ही सीकेडी या विकाराची लक्षणे आहेत. ‘‘सीकेडी या विकाराचे लवकर निदान होत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात या विकाराची लक्षणेच दिसून येत नाहीत. ६० टक्के रुग्णांमध्ये अखेरच्या टप्प्यात हा विकार झाल्याचे निदान होते. त्यावेळी डायलेसिस किंवा मूत्रिपड प्रत्यारोपण याशिवाय कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नसतो,’’ असे या विद्यापीठाच्या नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. विश्वजीत सिंह यांनी सांगितले. जर तुमचे डोळे आणि पाय सातत्याने सुजत असतील तर तात्काळ मूत्रिपड विकारतज्ज्ञांना भेटण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही मधुमेह किंवा अतितणावाने ग्रस्त असाल आणि ही लक्षणे आढळली तरी सीकेडी या विकाराची चाचणी करणे आवश्यक आहे, असे प्रा. सिंह यांनी सांगितले. जर सुरुवातीच्या टप्प्यात या विकाराचे निदान झाले तर केवळ औषधोपचारानेही हा विकार बरा होऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.

‘‘गेल्या काही वर्षांपासून सीकेडी या विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कारण भारतात तीनपैकी एक रुग्ण अतितणावाने ग्रस्त आहे. मात्र ६० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांना आपल्याला हा विकार झाल्याचे समजून येत नाही, तर ज्यांना या विकाराचे निदान झाले ते औषधोपचाराकडे दुर्लक्ष करतात,’’ असे मूत्रिपड विकारतज्ज्ञ डॉ. लाख्या कुमार यांनी सांगितले. सकस आहार, तणावाचे व्यवस्थापन आणि नियमित व्यायाम यांमुळे सीकेडी या विकारावर मात करता येऊ शकते, असे डॉ. कुमार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Risk ckd eyes swollen chronic urinary tract disorders akp