वातावरणातील बदलामुळे शहरासह ग्रामीण भागात व्हायरल इन्फेक्शन झपाट्याने पसरत आहे. बदलत्या ऋतूमुळे व्हायरल इन्फेक्शन सामान्य आहे. परंतु या संसर्गाचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. त्याकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते. व्हायरल इन्फेक्शनमुळे घसा खवखवणे, सर्दी-खोकला, ताप येऊ शकतो. त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजारांमध्ये वाढ होत आहे. कोरोनासोबतच मंकी पॉक्स आणि स्वाइन फ्लूचे रुग्णही वाढत आहेत. त्याचबरोबर लहान मुलांच्या आजारांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.जाणून घ्या कोणती लक्षणे दिसतात काळजी घ्यावी.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

( हे ही वाचा: Stress and Health: जास्त तणावामुळे होऊ शकतात ‘हे’ ८ गंभीर आजार; ‘या’ पदार्थांचे सेवन करा, नक्कीच फायदा होईल)

ही लक्षणे दिसताच काळजी घ्या

विषाणू संसर्ग पसरण्यामागे गर्दी आणि पावसाळा ही मुख्य कारणे आहेत. अलीकडच्या काळात ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीच्या तक्रारी करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. व्हायरल इन्फेक्शन असलेल्या रुग्णांमध्ये शिंका येणे, नाक वाहणे आणि डोळे जळणे ही सामान्य लक्षणे आहेत. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसली तर त्याच्यापासून अंतर ठेवा आणि जर तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

घराभोवती स्वच्छता ठेवा

संततधार पावसामुळे डासांची संख्याही वाढली आहे. साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. यामुळे डेंग्यू. मलेरिया आणि चिकुनगुनियासारख्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे घराभोवती पाणी साचू देऊ नका. साचलेले पाणी वेळोवेळी स्वच्छ करत रहा. इन्फ्लूएंझा विषाणूच्या वाढीसाठी ओलसर वातावरण सर्वोत्तम आहे.

( हे ही वाचा: Liver Cancer risk: तोंडाच्या ‘या’ समस्येकडे दुर्लक्ष केल्यास यकृताच्या कर्करोगाचा धोका ७५% वाढतो; ‘या’ उपायांमुळे टळेल जीवावरील धोका)

हळदीचा वापर फायदेशीर आहे

अंगदुखी, नाक बंद होणे, हलकासा ताप यांसारख्या समस्या येत असतील तर झोपताना एक ग्लास कोमट दुधात थोडी हळद मिसळून प्या. हळद आणि मधाची पेस्ट बनवूनही तुम्ही याचे सेवन करू शकता. हळदीमध्ये अँटीव्हायरल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात आणि विषाणूजन्य संसर्गापासून आपले संरक्षण करतात.

Story img Loader