Different Rose Color Meaning in Marathi: फेब्रुवारी हा खास महिना प्रेमाचा महिना मानला जातो. ७ फेब्रुवारीपासून ते १४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण आठवडा हा खास प्रेमीयुगुलांसाठीच आहे, असे जगभरात मानले जाते. तरूणाईत प्रचंड लोकप्रिय असणारा दिवस म्हणजे व्हेलेंटाईन डे. १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून भारतभर प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी महिन्याची ७ तारीख म्हणजे व्हॅलेंटाईन विकची सुरूवात. हा दिवस सुरू होतो तो गुलाबाच्या सुखद सुगंधाने.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Rose Day असं या पहिल्या दिवसाला नाव देण्यात आलं आहे. बुधवारी ७ फेबुवारी २०२४ ला रोझ डे आहे. यादिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. वास्तविक, गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गुलाबाचे विविध रंग उधळत आपल्या मनातील प्रेमभावना आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगितली जाते. गुलाबाच्या प्रत्येक रंगामागे एक वेगळी भावना दडलेली असते, त्यामुळे गुलाब देण्यापूर्वी या रंगांचा अर्थ जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबांचा अर्थ सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…
गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांमागील अर्थ
लाल गुलाब
लाल रंग प्रेम, सौंदर्य दर्शवतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा गुलाब दिला जातो. लाल गुलाबाचं फूल आपल्या मनातल्या भावना समोरच्याला सांगण्यासाठीचा एक मार्ग असतो. हे फूल निर्मळता, निरागसता आणि प्रेमाचं प्रतीक असतं. एकमेकांमध्ये भांडण झालं असेल, तर ते मिटवून प्रेम वृद्धिंगत करण्यासाठीही गुलाबाचं फूल दिलं जातं. एकंदरीत लाल गुलाबाच्या फुलाचा प्रेम आणि प्रेमी युगुलांशी खूप जवळचा संबंध आहे.
(हे ही वाचा : Valentine’s Day Gifts: प्रियजनांना व्हॅलेंटाईन डे निमित्त बजेट गिफ्टनिंग ऑप्शन हवेत? बघा यादी! )
गुलाबी गुलाब
गुलाबी गुलाब हे कौतुकाचं प्रतीक आहे. जर तुम्हाला कोणाची स्तुती करायची असेल तर त्यांना गुलाबी रंगाचा गुलाब देऊ शकता. व्हॅलेंटाइन डे हा केवळ पार्टनरसोबत प्रेम करण्यासाठी नसतो. तुम्ही आई, वडील, शिक्षक, भाऊ, बहीण, मित्र यांच्या विषयीही प्रेम व्यक्त करू शकता. त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी तुम्ही त्यांना गुलाबी गुलाब देऊन तुमच्या भावना व्यक्त करु शकता.
पिवळा गुलाब
पिवळ्या रंगाचा गुलाब हे मैत्री आणि आनंदाचे प्रतिक आहे. कुणाशी मैत्री करायची असल्यास तुम्ही पिवळा रंगाच गुलाब देऊ शकता, समोरच्या व्यक्तीने तुमचा गुलाब स्वीकारला तर त्याने तुमची मैत्री स्वीकारली असा अर्थ होतो.
केशरी गुलाब
केशरी गुलाब हे प्रेमातील ऊर्जा, उत्कटता आणि उत्साह या सर्व गोष्टींचे प्रतिक आहे. केसरी रंगाच्या गुलाब हा कुणाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी असतो. एखाद्याबद्दल प्रचंड उत्कटता असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची भेट घेऊन केशरी रंगाचा गुलाब देऊ शकता.
पांढरा गुलाब
पांढरा रंग शांततेचे प्रतीक मानला जातो. पांढरा गुलाब हे शुद्धता, निर्दोषता, कृपा आणि नम्रता या गोष्टींचे प्रतिक आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम किंवा आकर्षण असेल तर त्या व्यक्तीला पांढऱ्या रंगाचा गुलाब दिला जातो.
(टिप : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.)