चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आणि त्वचा सुंदर करण्यासाठी बहुतेक लोक गुलाबपाणी वापरतात. स्किन केअर रूटीनसाठी हे खूप फायदेशीर आहे. गुलाब पाणी केवळ चेहर्याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्याला पोषण देखील देते. परंतु त्वचेसोबतच गुलाबपाणी संपूर्ण आरोग्याची काळजी घेते हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. डोळ्यांपासून पोटापर्यंतच्या समस्यांवर गुलाबपाणी फायदेशीर ठरतं. चला तर जाणून घेऊया गुलाब पाण्याचे फायदे… डोळ्यांच्या समस्येवर फायदेशीर - आय ड्रॉप म्हणूनही गुलाबपाणी वापरतात. डोळ्यांमध्ये गुलाबपाणी वापरत असाल तर मोतीबिंदू सारख्या समस्यांचा धोका कमी होतो. गुलाब पाण्याचा वापर डोळ्यांच इन्फेक्शन आणि अॅलर्जी दूर करण्यासाठी केला जातो. दिवसभर आपले डोळे अनेक गोष्टींच्या संपर्कात येतात. दिवसभर कम्प्युटर समोर बसून काम करणं, स्मार्टफोनचा वापर करणं, पर्यावरणाचं नुकसान, अशातच गुलाबपाणी तुमच्या डोळ्यांना आराम देतं आणि इन्फेक्शनही दूर करतं. त्वचेसाठी फायदेशीर - गुलाब पाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धुळ माती निघून जाते. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो. यासाठीच उन्हाळ्यात त्वचा फ्रेश दिसावी असं वाटत असेल तर घराबाहेर पडताना एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरा आणि सोबत ठेवा. थकवा जाणवू लागल्यास चेहऱ्यावर शिंपडण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे तुम्ही लगेच फ्रेश दिसू शकाल. जखम बरी करण्यासाठी फायदेशीर - गुलाब पाण्यात अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. दुखापत आणि त्वचा बर्न झाल्यास आपण गुलाब पाणी वापरू शकतो, त्यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते आणि जळजळीपासून आराम मिळतो. नैराश्य-तणाव कमी होतो - गुलाबपाण्यामध्ये अँटी-डिप्रेशन आणि अँटी-एंझाईटी गुणधर्म आढळतात. त्याचा वापर तणाव कमी करण्यास मदत होते, उदासीनता आणि चिंता देखील दूर होते. गुलाबजलाच्या मदतीने झोपेची समस्याही दूर होऊ शकते. पचन व्यवस्थित होईल - गुलाबपाणी तुमची पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी काम करते, यामुळे पचनक्रिया मजबूत होऊ शकते. शरीरातील पाण्याची कमतरताही दूर होते. गुलाबपाणी वापरल्याने पोट खराब होणे, गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.