Gardening Tips in winter: जेव्हा आपण एखाद्याला फुले देण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिला विचार येतो तो गुलाबाचा. गुलाबाच्या फुलांच्या सौंदर्याची तुलना इतर कोणत्याही फुलाशी होऊ शकत नाही. अनोख्या सौंदर्यामुळे याला फुलांचा राजा म्हटले जाते. हे लक्षात घेऊन तुम्हीही तुमच्या बाल्कनीमध्ये हे लावले असेल तर त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. गुलाब ऋतूतील संबंधाबाबत काही माहिती अगोदर असणे गरजेचे आहे.

हिवाळ्यात झाडांची पुरेशी वाढ होत नाही. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ थांबण्याचा धोका असतो. त्यातल्या त्यात गुलाबाची झाडे तर सर्वांच्याच आवडीची असतात. परंतु, हिवाळ्यात गुलाबाच्या झाडांवर हवी तशी फुले उमलत नाहीत. हिवाळ्यातसुद्धा टवटवीत फुले उमलण्यासाठी तुम्ही ‘या’ टीप्सचा वापर करु शकता. जर तुम्हाला बागकामाची आवड असेल आणि तुमच्या बागेतील गुलाबाच्या रोपाला फुले येत नसतील तर काही बागकाम टिप्स खूप उपयुक्त ठरू शकतात. या टिप्सच्या मदतीने, झाड अवघ्या १५ दिवसात कळ्यांनी बहरून जाईल.

NG Acharya Udyan, Butterfly Festival, Mumbai,
मुंबई : एन. जी. आचार्य उद्यानात फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Lucky bamboo plant care
बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी
Badlapur, municipality , vegetable sellers Badlapur,
बदलापूर : आठवडी बाजार बंद करा, शहरातील भाजी विक्रेत्यांची पालिकेवर धडक
Kalyan-Dombivli water, amrit water channel,
कल्याण-डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट, अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली
soybean , soybean registration, soybean guaranteed rate,
सोयाबीन नोंदणीस मुदतवाढ, तरीही दर हमीभावापेक्षा कमी
Flowers to Welcome the New Year with Fresh Blooms
निसर्गलिपी : पुष्पबहराची दिनदर्शिका…
kdmc garden department warns action against decorative lighting on trees on occasion of the new year
डोंबिवली, कल्याणमध्ये वृक्ष प्रदूषित रोषणाई; पालिकेच्या उद्यान विभागाकडून कारवाईचा इशारा

मोहरीचे खत

हिवाळ्यात गुलाबाच्या झाडांवर टवटवीत फुले उमलण्यासाठी मोहरीचे खत अत्यंत फायदेशीर ठरते. काळ्या किंवा पिवळ्या मोहरीच्या खताचा वापर झाडाच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे. सर्वप्रथम बाजारातून आणलेल्या मोहरीच्या खतात पाणी टाकून त्यात मठ्ठा मिसळा. हे मिश्रण ३ दिवस झाकून ठेवा. ३ दिवस झाकून ठेवलेल्या खताच्या मिश्रण कुंडीतील मातीवर टाका. कुंडीत हे मिश्रण टाकल्यानंतर १५ ते २० दिवस दूसऱ्या कोणत्याच खताचा वापर करु नका.

शेणखत

वनस्पतींसाठी सर्वोत्तम आणि पारंपारिक खत म्हणजे शेण. गुलाब रोपाच्या मुळामध्ये कोरडे शेण टाकून गरजेनुसार व ऋतूनुसार पाणी देत ​​राहावे. त्यामुळे रोप निरोगी होईल आणि कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. काही वेळाने, रोपामध्ये कळ्या दिसू लागतील.

हेही वाचा >> औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?

कांद्याचे पाणी

एक भांडे घेऊन त्यात कांद्याची साले टाका. आता ते पाण्याने भरा आणि भांडे तीन दिवस सोडा. तीन दिवसांनी कांद्याचे पाणी गाळून गुलाबाच्या मुळांवर टाकावे. ही प्रक्रिया काही दिवस केल्याने गुलाबाची वाढ लवकर होईल.

कुंडीचा आकार

बऱ्याचदा कुंडीचा आकार लहान असल्याने फुले उमलण्यास समस्या निर्माण होतात. गुलाबाच्या रोपासाठी कमीत कमी १५ ते १८ इंचाची कुंडी असावी. तसेच, कुंडीतील रोपाला पाणी घालण्याची वेळ आणि प्रमाणही योग्य असले पाहिजे.

Story img Loader