बुलेटची निर्मिती करणारी ख्यातनाम कंपनी ‘रॉयल एनफील्ड’ने आपल्या 7 हजार बुलेट परत मागवल्या(रिकॉल) आहेत. परत मागवण्यात आलेल्या बाइक्सची 20 मार्च 2019 ते 30 एप्रिल 2019 या दरम्यान निर्मिती करण्यात आली आहे. ब्रेक कॅलिपर प्लेटमध्ये कमतरता असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर कंपनीने या बाइक्स परत मागवण्याता निर्णय घेतला आहे.
ब्रेक कॅलिपर प्लेटबाबत ग्राहकांकडून बऱ्याच तक्रारी आल्या होत्या, या तक्रारींची दखल घेत कंपनीने जवळपास 7000 गाड्या ग्राहकांकडून परत मागवल्या आहेत. ब्रेक कॅलिपर प्लेट हा बाइकमधील महत्त्वाचा भाग आहे. परिणामी, या गाड्यांमध्ये सुधारणा करून त्या ग्राहकांना लवकरच परत केल्या जातील असं कंपनीने म्हटलं आहे. रिकॉल केलेल्या बाइक्समध्ये बुलेट 500, बुलेट 350 आणि बुलेट 350 ES मॉडल्सचा समावेश आहे.
Royal Enfield Bullet 350 आणि रॉयल एनफील्ड Bullet 350 ES मध्ये 346cc, सिंगल सिलिंडर, 4-स्ट्रोक, ट्विनस्पार्क, एअर कुल्ड इंजिन आहे. हे इंजिन 19.8bhp ची पावर आणि 28Nm चा पिक टॉर्क जनरेट करतं. या इंजिनासह 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनचाही पर्याय आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने Bullet 350 आणि Bullet 350 ES या बाइक्स सिंगल चॅनल एबीएस या फीचरसह लाँच केल्या आहेत.
रॉयल एनफील्ड Bullet 500 मध्ये 499 cc, सिंगल-सिलिंडर, 4-स्ट्रोक, स्पार्क इग्निशन, एअर-कुल्ड, फ्युअल इंजेक्शन इंजिनचा वापर करण्यात आला आहे. या इंजिनसह 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. या बाइकच्या पुढील बाजूला 2-पिस्टन कॅलिपरसह 280 mm डिस्क आणि मागील बाजूला सिंगल पिस्टन कॅलिपरसह 240 mm डिस्क आहे.