Diabetes, High BP, Obesity Myths: बदलत्या जीवनशैलीनुसार आजारांची गंभीरता दिवसागणिक वाढत आहे. अतिवजन, रक्तदाब व मधुमेह या साखळीने आज जगभरातील कोट्यवधी लोकसंख्येला विळखा घातला आहे. या तीनही समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला नियमित आयुष्यात काही साधे सोपे बदल करायचे आहेत. हे बदल त्यासंबंधित समज गैरसमज याविषयी इंडियन एक्सप्रेसने सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्याशी संवाद साधला. रुजुता दिवेकर यांनी मधुमेह, रक्तदाब व वजनाच्या समस्यांशी संबंधित पाच मुख्य व वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर उत्तर दिले आहे, चला तर मग जाणून घेऊयात..

प्रश्न 1: मधुमेह व उच्च रक्तदाब असल्यास केळी खाऊ नये?

रुजुता दिवेकर सांगतात की, सर्वच फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, फ्रक्टोजचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने मधुमेहींना केळी खाण्याची परवानगी दिलेली आहे मात्र आजही भारतीय डॉक्टरांच्या मनात केळीच्या सेवनाबाबत शंका आहेत. अनेक आहारतज्ज्ञही मधुमेहाच्या रुग्णांनी केळी खाऊ नये असे सांगतात. केळीमध्ये खनिजांचे प्रमाण मुबलक असते परिणामी मधुमेहींना याचा लाभ होऊ शकतो तसेच उच्च रक्तदाब टाळण्यासाठीही केळीचा फायदा होतो.

health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ating eggs with cholesterol
दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ? वाचा डॉक्टर काय सांगतात
Ram Kapoor recently shared his personal struggles with weight loss,
“दोनदा ३० किलो वजन कमी केले पण पुन्हा ‘जैसे थे’! नेमके चुकले कुठे? राम कपूरने केला खुलासा, तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
What are nutritional powerhouses for liver
Nutritional Powerhouses For Liver : क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? यकृतासाठी होतो मोठा फायदा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात…
Here’s what happens to the body if you have ghee water on an empty stomach daily
Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा
Rajiv Kapoor alcohol addiction heart disease cardiovascular health
अभिनेता राजीव कपूर यांच्या मृत्यूसाठी मद्याचे व्यसन ठरले कारणीभूत; हृदय आणि रक्तवाहिन्यांवर कसा परिणाम झाला? वाचा डॉक्टर काय सांगतात
Benefits of wearing socks at night
Sleeping With Socks : रात्री मोजे घालून झोपल्याने मिळतात अनेक फायदे; पण ‘या’ चुकांमुळे होतील अनेक आरोग्य समस्या

प्रश्न 2: चहा/कॉफीमध्ये साखर टाळावी का? डायजेस्टिव्ह बिस्किटे खाऊ शकतो का?

रुजुता दिवेकर यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही चहा किंवा कॉफीमधून घेत असलेली एक चमचाभर साखर ही डायजेस्टिव्ह बिस्किटाच्या तुलनेत नेहमीच उत्तम पर्याय ठरते. बिस्किटांमध्येही साखरेचा वापर होतोच त्याऐवजी जर तुम्ही बिस्कीट टाळून चहा कॉफीमध्येच साखर वापरली तरी काही हरकत नसते उलट, तुम्ही चहातील साखरेचे प्रमाण स्वतः नियंत्रणात ठेवू शकता. मधुमेहावर मात्र करायची असल्यास काय खावे या इतकेच किती खावे या प्रश्नाकडेही बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रश्न 3: तुप खाल्ल्यास शरीरातील फॅट्स वाढतात का?

स्पष्ट सांगायचं तर हो! तूप व नारळ या दोन्हीमध्ये फॅटी ऍसिड असतात मात्र हे फॅट्स शरीराला लाभदायक ठरू शकतात, यामुळे मधुमेहींना आवश्यक इन्सुलिन शरीराला मिळते तसेच हृदयाचे विकारही टळतात. तुपाच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होत असल्याने आतड्यांच्या त्वचेची स्वच्छता होते.
जर तुम्हाला मधुमेह असेल तर, आहारात तुपाचे सेवन (प्रमाणात) करणे टाळू नये.

प्रश्न 4: मधुमेह कमी करण्यासाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे का?

आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की दररोज चालणे हे उत्तम आरोग्यासाठी पुरेसे आहे. मात्र हेल्दी शरीरासाठी स्नायूंच्या मजबुतीवर काम करणे गरजेचे आहे. शरीरातील शक्ती कमी होणे हे इन्सुलिनच्या क्षमतेशी संबंधित असते त्यामुळे केवळ चालण्यापेक्षा मसल्स ट्रेनिंग करणे गरजेचे आहे.

उंचीनुसार तुमचे वजन परफेक्ट आहे का? इंच व किलोचं बेस्ट समीकरण जाणून घ्या, पाहा तक्ता

प्रश्न ५: मधुमेहावर उपाय नाही?

आहार, व्यायाम आणि जीवनशैलीचा समतोल साधून आपण रक्तातील साखरेला नियंत्रित ठेवू शकता. यासाठी पारंपरिक व मुख्यतः प्रत्येक हंगामानुसार पदार्थांचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. हेल्दी आयुष्याचे उदाहरण असणाऱ्या जुन्या पिढीप्रमाणे पद्धतशीर खा आणि तुमच्या झोपेच्या वेळेचे नियमन करा. तुमचा ताण व साखर दोन्ही नियंत्रणात राहील व तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

Story img Loader