Rules Change From March 1: फेब्रुवारी महिना संपत आला आहे. उद्यापासून मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. उद्या म्हणजेच १ मार्चपासून लोकांचे पगार होणार आहे. नव्या महिन्याचा पहिल्या दिवसापासून राज्यामध्ये बॅंकींग क्षेत्र, रेल्वेचे वेळापत्रक अशा काही गोष्टींवर नवे नियम लागू होणार आहेत. याबाबतची घोषणा सरकारद्वारे करण्यात आली असून त्यांचा एकूण परिणाम पगारावर, खर्चावर आणि मासिक नियोजनावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मार्च २०२३ मध्ये कोणते नवे नियम लागू होणार आहेत आणि त्याचा परिणाम सामान्यांच्या खिश्यावर कसा होणार आहे याची माहिती मिळवूया.
बॅंकांमधील कर्जाचे दर वाढणार आहेत.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नुकतीच रेपो दरामध्ये वाढ केली. यानंतर अनेक बॅंकाद्वारे त्यांच्या MCLR दरामध्येही वाढ केली गेली. याचा थेट परिणाम कर्ज आणि व्याजदरावर होणार आहे. वाढलेल्या व्याजदरामुळे मासिक हफ्त्यामध्येही वाढ होऊ शकते. यामुळे सर्वसामान्यांचे मासिक नियोजन बिघडू शकते.
LPG आणि CNGच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे.
एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी यांची किंमत दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये निश्चित केल्या जातात. मागच्या वेळेस एलपीजी सिलिंडरची किंमतीमध्ये वाढ झाली नव्हती. इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, पुढच्या महिन्यामध्ये त्यामध्ये वाढ होऊ शकते.
रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल केले जाऊ शकतात.
उन्हाळ्यामध्ये देशभरात सुट्ट्या असतात. यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा लागू शकतो. मार्च महिन्यामध्ये याबद्दलची अधिकृत माहिती रेल्वे विभागाकडून दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२३ पासून ५००० मालवाहू गाड्या आणि हजारो प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये रेल्वे मुख्यालयाद्वारे बदल केले जाऊ शकतात.
बॅंक हॉलिडे (Bank Holiday)
मार्च २०२३ मध्ये एकूण १२ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये शनिवार, रविवार यांच्यासह होळी, राम नवमी या सणांचा समावेश आहे.
सोशल मीडियासंबंधित कायद्यांमध्ये नव्या तरतुदी होण्याची शक्यता आहे.
भारत सरकारने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया साइट्स वापरता सरकारच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. याशिवाय मार्च महिन्यामध्ये धार्मिक बाबींवरील आक्षेपार्ह पोस्ट्स अशा विषयांबाबत नवे नियम लागू केले जाणार आहेत. या धोरणांनुसार दोषींना शिक्षा होणार आहे.