दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ ऑगस्टपासून ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू झाली असून ती १५ ऑगस्टपर्यंत चालणार असून या मोहिमेचा तिसरा टप्पा सुरूही झाला आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट देशभक्ती आणि एकात्मतेचा संदेश प्रसारित करणे हे आहे. राष्ट्रध्वज सर्व नागरिकांच्या सामूहिक राष्ट्र उभारणीच्या उद्दिष्टांचे प्रतीक आहे.

देशभरातील लोक ध्वज फडकावत असताना, भारतीय ध्वज संहिता २००२ मध्ये राष्ट्रध्वज फडकावण्याचे अनेक नियम आहेत. प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट, १९७१ द्वारेदेखील हे मान्य केले आहे. खाली काही नियम दिले आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

Uttarakhand UCC portal marriage registrations
Uttarakhand UCC: समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये विवाह नोंदणी कशापद्धतीने सुरू आहे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Reliance Jio Republic Day Offer 2025
Republic Day Offer 2025 : अशी भन्नाट ऑफर शोधून सापडणार नाही! फक्त एकदा करा रिचार्ज आणि मिळवा भरपूर कूपन
On 76 republic day know which are the tallest Flags in India two of them are in Maharashtra
Tallest Flags in India: भारतात ‘या’ ठिकाणी फडकतो सर्वात उंच तिरंगा, महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांचा समावेश
Republic Day 2025 How India chooses its chief guest for Republic Day celebrations
Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या पद्धत
Republic Day 2025 Updates: प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा समारोप
Padma Award 2025
Padma Award 2025 : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील दिग्गजांचा समावेश
Republic Day Quiz 2025 quiz five questions about General Knowledge 26 January Information Gk
Republic Day Quiz 2025: २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? या आणि अशाच काही रंजक प्रश्नांची द्या झटपट उत्तरं!

राष्ट्रध्वज कोणाला आणि कोणत्या दिवशी फडकावण्याची परवानगी आहे? (Who is allowed to fly a national flag and on which days?)

भारतीय ध्वज संहिता, परिच्छेद २.२ नुसार, कोणतीही व्यक्ती, संस्था, खाजगी किंवा सार्वजनिक आणि शैक्षणिक संस्था राष्ट्रध्वजाच्या सन्मानानुसार सर्व दिवशी किंवा प्रसंगी राष्ट्रध्वज फडकवू शकतात. हा नियम २६ जानेवारी २००२ रोजी लागू झाला.

आपण ध्वज कसा निवडावा? How do you choose a flag?

ध्वज कोणत्याही आकाराचा असू शकतो, “परंतु राष्ट्रीय ध्वजाच्या लांबी आणि उंचीचे (रुंदी) गुणोत्तर ३:२ असावे.” याचा अर्थ असा की, ध्वज नेहमी आयताकृती असावा. चौरस किंवा इतर कोणताही आकार नसावा. ३० डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या दुरुस्तीनंतर, ध्वज हा हाताने किंवा यंत्राने तयार केलेला कॉटन, पॉलिस्टर, लोकर, रेशीम, खादी यापासून तयार केलेला असावा.

हेही वाचा – Har Ghar Tiranga 2024: ‘हर घर तिरंगा’ अभियानात तुम्हालाही सहभागी व्हायचं ना? मग ‘या’ स्टेप्स करा फॉलो अन् तुमचं प्रमाणपत्र डाउनलोड करा

जर तुमचा ध्वज खराब झाला असेल तर? (What if your flag is damaged?)

राष्ट्रध्वज नेहमी विशिष्ट ठिकाणी आणि सन्मानाच्या स्थितीत असावा आणि खराब झालेला किंवा विस्कटलेला ध्वज फडकावणे नियमांच्या विरुद्ध आहे.

“इतर कोणताही ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा वर किंवा बाजूला ठेवू नये; राष्ट्रध्वज फडकत असताना ध्वजस्तंभावर फुले किंवा हार किंवा चिन्हासह कोणतीही वस्तू ठेवू नका. ध्वज ज्या खांबावरून फडकवला आहे, त्यावर कोणत्याही जाहिराती असू नयेत.

तिरंगा छापलेले कपडे परिधान करणे योग्य आहे का? (is it ok to wear the Tricolour in a display of love for the nation?)

कायद्यानुसार, सर्व व्यक्तींना ‘वेशभूषा किंवा गणवेशाचा भाग म्हणून’ राष्ट्रध्वज वापरण्यास मनाई आहे. राष्ट्रध्वज हा कोणत्याही व्यक्तीच्या कमरेच्या खाली वापरली जाणारी वस्तू म्हणून वापरले जाऊ शकत नाही. तो उशी, रुमाल, अंडरवेयर किंवा इतर कोणत्याही ड्रेसवर भरतकाम करून किंवा छापून वापरला जाऊ शकत नाही.

हेही वाचा – Independence Day 2024 Wishes : ‘स्वातंत्र्य दिना’निमित्त Texts, WhatsApp Messages द्वारे खास मराठीतून पाठवा शुभेच्छा, पाहा यादी

राष्ट्रध्वज वाहनांवर लावता येईल का?(Can it be put up on vehicles?)

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि इतर मान्यवरांच्या वाहनांशिवाय कोणत्याही वाहनांवर राष्ट्रध्वज फडकवता येणार नाही. ध्वजाचा वापर कोणत्याही वाहनाच्या बाजूने, पाठीमागे आणि छतावर झाकण्यासाठी केला जाऊ नये.

स्वातंत्र्यदिनानंतर तिरंग्याचे काय करायचे? (What should you do with the Tricolour after Independence Day?)

स्वातंत्र्यदिनानंतर राष्ट्रध्वज व्यवस्थित जपून ठेवावा. जर ध्वज खराब झालेल्याअवस्थेत असेल तर तो रस्त्यावर टाकला जाऊ नये किंवा त्याची अनादराने विल्हेवाट लावली जाऊ नये याची काळजी घ्यावी. ध्वजाची विल्हेवाट संपूर्ण खाजगीरित्या, शक्यतो जाळून किंवा ध्वजाच्या प्रतिष्ठेशी सुसंगत इतर कोणत्याही पद्धतीने लावली जावी.

स्वातंत्र्य समारंभानंतर कागदापासून बनवलेले ध्वज जमिनीवर फेकले जाऊ नयेत. कारण ध्वज संहितेमध्ये असे म्हटले आहे की, “राष्ट्रध्वजाचा जमिनीला किंवा पाण्यात असलेल्या पायवाटेला स्पर्श होऊ नये.”

हेही वाचा –Independence Day Speech: १५ ऑगस्टला भाषणासाठी तयारी करताय? मग फॉलो करा ‘या’ ७ टिप्स; टाळ्यांच्या गजरात होईल कौतुक

राष्ट्रध्वजाचा अनादर केल्यास काय शिक्षा? (What is the punishment for disrespecting the flag?)

राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ च्या कलम २ नुसार, “जो कोणी सार्वजनिक ठिकाणी, इतर कोणत्याही ठिकाणी भारतीय राष्ट्रध्वज जाळतो, विटंबना करतो, पावित्र्य नष्ट करतो, विद्रूप करतो, नष्ट करतो, पायदळी तुडवतो अन्यथा अवमान करतो (शब्दांद्वारे, बोलून किंवा लिखित किंवा कृतीद्वारे असो…. ) अशा व्यक्तीला तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

Story img Loader