आजपासून नवीन आर्थिक सुरू झालं आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक बदल झाले आहेत. हा बदलाचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. पोस्ट ऑफिसपासून बँकिंग आणि गुंतवणुकीपर्यंत अनेक नियमांचा यात समावेश आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी वाढू शकतात. आजपासून घर घेणं महाग होणार आहे. केंद्र सरकार घर खरेदीदारांना कलम ८०ईईए अंतर्गत कर सूट देणे बंद केलं आहे. पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरस अशा अनेक औषधांच्या किमती १० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.

पोस्ट ऑफिस
आजपासून पोस्ट ऑफिसच्या काही योजनांच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. या नियमांनुसार, आता ग्राहकांना टाइम डिपॉजिट खातं, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करण्यासाठी बचत खाते किंवा बँक खाते उघडावे लागेल. त्याचबरोबर लहान बचतीत जमा केलेल्या रकमेवर पूर्वी जे व्याज मिळत होते ते आता फक्त पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात किंवा बँक खात्यात जमा केले जाईल. एवढंच नाही तर पोस्ट ऑफिसचे छोटे बचत खाते बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस खात्याशी जोडणे अनिवार्य आहे.

अ‍ॅक्सिस आणि पीएनबी बँक
अ‍ॅक्सिस बँकेने बचत खात्यासाठी मासिक मर्यादा १० हजार रुपयांवरून १२ हजार रुपये केली आहे. दुसरीकडे, पीएनबीने घोषणा केली आहे की, ४ एप्रिलपासून पॉझिटीव्ह पे प्रणाली लागू करणार आहे. पॉझिटीव्ह पे प्रणाली अंतर्गत, पडताळणीशिवाय चेक पेमेंट शक्य होणार नाही. १० लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठी हा नियम अनिवार्य आहे. पीएनबीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या नियमाची माहिती दिली आहे.

जीएसटी
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत ई-इनव्हॉइस जारी करण्यासाठी उलाढाल मर्यादा ५० कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून २० कोटी रुपये केली आहे. हा नियम आजपासून लागू केला जात आहे.

क्रिप्टो करन्सी
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात क्रिप्टो कराची माहिती दिली होती. आजपासून सरकार व्हर्च्युअल डिजिटल अ‍ॅसेट (VDA) किंवा क्रिप्टोवरही ३० टक्के कर आकारणार आहे. याशिवाय, जेव्हा जेव्हा क्रिप्टो मालमत्ता विकली जाते, तेव्हा त्याच्या विक्रीतून १% टीडीएस देखील कापला जाईल.

Story img Loader