जगात अनेक लहान मुले व मोठी माणसेही सर्दी होऊन नाक वाहण्याने हैराण असतात, वैज्ञानिकांना आता त्याचे नेमके कारण समजले असून त्यावर अचूक उपाय करणे सोपे होणार आहे.
कोलेरॅडो स्कूल ऑफ मेडिसिन युनिव्हर्सिटीचे संशोधक यावर संशोधन करीत असून त्यांच्या मते लाखो लोकांना नाक वाहण्यापर्यंत सर्दीचा त्रास होतो व त्यात अॅलर्जी किंवा संसर्ग हे कारण नसते. काही जण त्याला स्निफल्स (सर्दीने फुसफुसणे) असे म्हणतात. त्याला वैज्ञानिक अॅलर्जीविना झालेला नासिकादाह असे म्हणतात.
अशा प्रकारची सर्दी हा नवीन प्रकार नसला तरी ती का होते याबाबत अनेक कारणे सांगितली जात होती, मसालेदार अन्न, भावनातिरेक, हवा प्रदूषण अशी अनेक कारणे त्यासाठी दिली जात असत. पण थॉमस फिंगर यांच्या मते उंदराच्या नाकातील पेशींच्या आधारे वाहणाऱ्या नाकाच्या कारणांचा उलगडा झाला आहे.
या पेशींना सॉलिटरी केमोसेन्सरी सेल्स असे म्हणतात. त्या पेशी विक्षोत्रक घटकांमुळे निर्माण झालेली संवेदना चेतापेशींपर्यंत पोहोचवते व या चेतापेशी असा एक पदार्थ स्त्रवण्याचा आदेश देतात त्यामुळे नाक वाहते व श्वासात अडथळा निर्माण होतो.
हे नेमके कसे घडते यावर संशोधन झाले असून अशा प्रकारे शरीर देत असलेला प्रतिसाद थांबवला तर नाक वाहण्याचे थांबेल. जर हा नैसर्गिक प्रतिसाद बंद केला तर त्याचे वाईट परिणाम होणार तर नाही ना असा एक विषय यात आहे.
प्रतिसादाची ही क्रिया उंदरांसारखीच माणसात घडते किंवा नाही हे अजून समजलेले नाही पण जर तसे असेल तर संबंधित घटक व वास यांच्यापासून लोकांना वाचवता येईल, ज्यामुळे तशा प्रकारचा स्त्राव सोडला जाणार नाही.
त्यामुळे लाखो लोकांना नाक चोंदणे, नाक वाहणे यापासून सुटका मिळू शकेल असे नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकात म्हटले आहे.
वाहते नाक थांबविता येईल..
जगात अनेक लहान मुले व मोठी माणसेही सर्दी होऊन नाक वाहण्याने हैराण असतात, वैज्ञानिकांना आता त्याचे नेमके कारण समजले असून त्यावर अचूक उपाय करणे सोपे होणार आहे.
आणखी वाचा
First published on: 12-04-2014 at 05:39 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Running nose can be stop