रशियन मॉडेल एकॅटेरिना लिसिना सध्या चर्चेत आहे. जगातील सर्वात लांब पाय असलेली महिला आणि मॉडेल म्हणून तिच्या नावाची नोंद ‘गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झालीय. पण कोणे एकेकाळी आपल्या पायांमुळे मोठा न्यूनगंड तिला होता.

तिचे लांब पाय पाहून कोणी ‘जिराफ’ तर कोणी ‘शिडी’ म्हणून तिची टेर खेचायचे. शाळेत तर अनेकदा ती मुलांच्या चेष्टेचा विषय होती. मुलांसोबत तिची नेहमीच भांडणं व्हायची. आपणच असे का? हा प्रश्न तिला सारखा पडायचा. पण हळहळू आपण जगापेक्षा वेगळे आहोत याची जाण तिला होऊ लागली. ६.९ फूट उंच असलेल्या एकॅटेरिनाची मॉडलिंग विश्वात चर्चा होऊ लागली. जगातील सर्वात लांब पाय असलेली महिला म्हणून तिची नुकतीच ‘गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालीय. तिच्या पायांची लांबी १३२ सेंटीमीटर आहे.

indias cheapest bikes motorcycles with 110km mileage
होंडा शाइनसह ‘या’ ३ बाईक्समध्ये मिळणार भरपूर मायलेज अन् किंमत ७० हजारांपेक्षा कमी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
An eight-foot wooden bull history of Tanha Pola in Nagpur
अबब… आठ फुटांचा लाकडी बैल… नागपुरातील तान्हा पोळ्याचा असा आहे इतिहास…
Top 5 vehicles in Google trends know their prices and features
Top 5 vehicles in Google trends: गूगलवर चर्चेत असलेले पाच सर्वोत्तम कार आणि बाइक, जाणून घ्या त्यांची किंमत्त अन् फिचर्स
apple ecosystem to create 5 6 lakh jobs in India
Jobs in India : ‘ॲपल’कडून देशात वर्षभरात सहा लाखांना रोजगार
Success Story of second richest IITian Vinod Khosla
जिद्दीला सलाम! अपयशाची रांग असूनही केले अथक प्रयत्न अन् झाले जगातील सर्वात श्रीमंत IITian’sपैकी एक; जाणून घ्या विनोद खोसला यांची यशोगाथा
japans tomiko itooka news
Tomiko Itooka : जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती कोण? ‘या’ महिला गिर्यारोहकाने पटकावला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब!
most powerful scooters on sale in India today
भारतातील सर्वात शक्तिशाली टॉप ५ पेट्रोल स्कूटर, जाणून घ्या खास

वाचा : उंची वाढत नाहीये? हे आसन करुन पाहा…

२००८ मध्ये बिजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तिने बॉस्केटबॉल खेळात रशियाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. यात तिने देशाला कांस्य पदकही जिंकून दिलं होतं. लांब पायांमुळे जरी तिच्या नावे विक्रम जमा झाला असला तरी या पायांमुळेच रोजच्या आयुष्यात वावरताना तिला अनेक अडचणींना समोरं जावं लागातंय. पायांमुळे विमानात किंवा गाडी बसतानाही तिला त्रास होतो. अनेकदा मापाच्या चप्पलाही मिळत नासल्याचं तिच म्हणणं आहे.

वाचा : उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते महागडी कॉफी, किंमत माहितीये?