भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती दरवर्षी ‘सद्भावना दिवस’ म्हणून साजरी केली जाते, ज्याचा शाब्दिक अर्थ हार्मोनी डे आहे. १९४४ मध्ये २० ऑगस्ट रोजी जन्मलेले, राजीव गांधी भारताचे सहावे पंतप्रधान होते आणि वयाच्या ४० व्या वर्षी भारतीय पंतप्रधानांचे पद स्वीकारणारे सर्वात तरुण पंतप्रधानांचे होते. राजीव गांधी यांनी १९८४ मध्ये त्यांच्या आई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पदभार स्वीकारला. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राजीव गांधी अवघ्या तीन वर्षांचे होते आणि त्यांचे आजोबा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. फिरोज आणि इंदिरा गांधी यांच्याकडे जन्मलेल्या, राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी चेन्नईजवळील श्रीपेरंबुदूर येथे एका जाहीर रॅलीदरम्यान हत्या करण्यात आली. त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – भारतरत्न प्रदान करण्यात आला.
Rajiv Gandhi Birth Anniversary: आज का साजरा करतात ‘सद्भावना दिवस’?
राजीव गांधी यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात भारतरत्न प्रदान करण्यात आला.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-08-2021 at 08:45 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadbhavana diwas 2021 rajiv gandhi birth anniversary former prime minister of india ttg