करोना विषाणूच्या संक्रमणामुळे आपल्या आयुष्यावर कमालीचा परिणाम झाला आहे. लॉकडाउनमुळे ज्या ग्राहकांचा रोख रकमेचा ओघ आटला आहे, त्या ग्राहकांना मदत करण्यासाठी अनेक बँका मॉरेटोरिअम (ईएमआय स्थगित करून पुढे ढकलणे) ही सुविधा देत आहेत. परंतु, हप्ता पुढे ढकलल्यास त्यावर व्याज भरावे लागणार असल्याने, ज्या ग्राहकांना कोविड १९ साथीमुळे आर्थिक फटका बसलेला नाही त्या ग्राहकांनी ईएमआय नियमितपणे भरावा. असंख्य संख्येने ग्राहक आपापल्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग साइटचा वापर करून ईएमआय स्थगित करण्याचा पर्याय स्वीकारत असल्याने, या ग्राहकांना लुटण्यासाठी नव्या प्रकारचे घोटाळे करण्याची संधी शोधणारे घोटाळेखोर सातत्याने प्रयत्न करत आहेत. काही केसेसमध्ये, घोटाळेखोर ग्राहकांना कॉल करत आहेत, त्यांचे ईएमआय पुढे ढकलण्यासाठी बँकांनी जाहीर केलेल्या मॉरेटोरिअमचा फायदा घेणयासाठी त्यांना ओटीपी विचारत आहेत. एकदा ग्राहकाने ओटीपी दिला की घोटाळेखोर ग्राहकांच्या खात्यातून तातडीने पैसे काढून घेतात. अशा घोटाळेखोरांबद्दल जागृती करण्यासाठी आणि ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी, आयसीआयसीआय बँकेने सुरक्षितपणे बँकिंग कसे करावे, याचे मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये, मोबाइल बँकिंग करत असताना, ग्राहकांनी कोणत्या सुरक्षेच्या टिप्स विचारात घ्याव्यात, याचा समावेश करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा