Safe Time To Have Sex After Periods: प्रत्येक जोडप्याचं कुटुंब नियोजन हे त्याच्या सोयीने केलेलं असावं, काहींना लग्नानंतर वर्षभरातच बाळ हवं असतं तर काही जण आपापला वेळ घेऊन मग बाळाचा विचार करतात. जर गर्भधारणा टाळायची असेल तर शारीरिक संबंध ठेवताना अनेकांना अनेक प्रश्न पडतात. मुख्यतः पाळीच्या कितव्या दिवशी सेक्स करू शकतो हा प्रश्न बहुतांश स्त्रियांना पडतोच. मैत्रिणींनो गर्भधारणेच्या सर्व प्रश्नांसाठी आपल्याला ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजेच ज्या काळात आपले शरीर गर्भधारणेसाठी सर्वात अधिक तयार असते तो काळ ओळखणे गरजेचे आहे. हे दिवस तुमच्या मासिक पाळीच्या २८ दिवसाच्या चक्रानुसार ठरतात. यासंदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात..

ओव्ह्युलेशनचा दिवस कसा ओळखावा?

डॉ. दिपाराणी पुजारी- पंडित यांच्या माहितीनुसार, मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. मासिक पाळी नंतरचा १४ वा दिवस ओव्ह्युलेशनचा असतो. ओव्ह्युलेशनच्या ५ दिवस आधी किंवा ओव्ह्युलेशनच्या दिवशी सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे मासिक पाळी संपल्यावर निदान एक आठवड्याचा कालावधी हा सुरक्षित मानला जातो. याला अपवाद असू शकतात त्यामुळे जर आपण प्रेग्नन्सी टाळत असाल तर या काळातही गर्भनिरोधक उपायांशिवाय शारीरिक संबंध ठेवणे टाळावे.

pregnancy early sign
गर्भधारणा झाल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी शरीरात दिसू लागतात ‘ही’ ५ लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Best Time To Have Sex To Get Pregnant Or Avoid Pregnancy Know From Sex Expert
सेक्स करण्याची बेस्ट वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात, प्रेग्नन्सी हवी किंवा टाळायची असल्यास शरीरसंबंध कधी ठेवावे?
Bigg Boss 18 Chahat Pandey Proposed marriage to salman khan
Bigg Boss 18: चाहत पांडेने सलमान खानला घातली लग्नाची मागणी, भाईजान म्हणाला, “तुझ्या आईचं आणि…”
sex during period
मासिक पाळीदरम्यान सेक्स? तर… हे नक्की वाचा
Viral student answer sheet makes teacher shocked making people crazy big boss marathi suraj Chavan answer viral photo
PHOTO: बिग बॉसचा लहान मुलांवरही परिणाम! परीक्षेत लिहलेलं उत्तर वाचून शिक्षक कोमात; उत्तरपत्रिका वाचून पोट धरुन हसाल
NCP Sharad Pawar Third Candidate List
NCP Sharad Pawar Third Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार
funny video goes viral
“शाळेत जात नाही, म्हशी राखते” चिमुकलीने स्पष्टच सांगितले, VIDEO पाहून पोट धरून हसाल

मासिक पाळीच्या ८ ते ९ दिवस नंतर ते २१ व्या दिवसापर्यंतचा काळ हा ओव्ह्युलेशनचा असतो. मासिक पाळी नंतर लगेचच गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी असते मात्र काही अपवादत्मक स्थितीत गर्भधारणा होऊ शकते. यामागचे मुख्य कारण म्हणजे पुरुषाचे वीर्य हे स्त्रीच्या शरीरात ७२ तासांपर्यंत राहते. अशावेळी आवश्यक काळजी घेऊनच शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला जातो.

मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्यास गर्भधारणा होते का?

मासिक पाळीच्या काळात शारीरिक संबंध केल्याने गर्भधारणा होण्याचा धोका कमी असतो. या काळात महिलांमध्ये बीजफल होत नाही. असं असलं तरीही काही स्त्रिया मासिक पाळीतही प्रजननक्षम असू शकतात, मासिक पाळीतील अनियमितपणामुळे असे होण्याची शक्यता असते.