इस्लामिक मूल्यांना प्रमाण मानणाऱ्या इंटरनेट ब्राउजरची प्रचंड मागणी असल्याचे सांगत मलेशियातल्या एका स्टार्ट अप कंपनीनं असं ब्राउजर लाँच केलं आहे. खासगी डेटाची चोरी होत असल्याचे आरोप, पूर्वग्रहदूषित व चारीत्र्यहनन करणाऱ्या इंटरनेटवरील पोस्टच्या पार्श्वभूमीवर हे ब्राउजर आवश्यक असल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सलामवेब (SalamWeb) हे मोबाईल ब्राउजर अॅप असून मुस्लीमांना आपलासा वाटेल असा अनुभव या ब्राउजरवर मिळेल असा दावा करण्यात आला आहे. या अॅपमध्ये मेसेजिंगची सेवा, बातम्या व अन्य फीचर्सचा समावेश आहे. सध्यातरी विशेषत: मलेशिया व इंडोनेशियामध्ये या ब्राउजरचे युजर्स असल्याचे सलाम वेब टेक्नॉलॉजीजच्या व्यवस्थापकीय संचालक हसनी झरीना मोहम्मद खान यांनी सांगितल्याचे वृत्त ब्लूमबर्गनं दिलं आहे. जगामध्ये 1.8 अब्ज इतकी मुस्लीमांची संख्या आहे. यापैकी 10 टक्के म्हणजे सुमारे 18 लाख मुस्लीम हे अॅप वापरतील असं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. चुकीची माहिती पसरवणं, समाजाला हानी पोचवेल असे संदेश पसरवणं यावर नियंत्रण राखण्यात अपयश आल्याची टीका गुगलपासून फेसबूकपर्यंतच्या तंत्रज्ञानातील कंपन्यांवर होत असल्याचे हसनी झरीना यांनी निदर्शनास आणले आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने तर ट्विटर हे महिलांसाठी विषारी माध्यम असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

“इंटरनेट ही चांगली जागा व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. इंटरनेटवर चांगलंही आहे नी वाईटही. त्यामुळे सलामवेबचा असा प्रयत्न आहे की या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला इंटरनेटवरील चांगल्या गोष्टींचा अनुभव घेता येईल,” हसनी झरीना यांनी सांगितलं. सलामवेब वेबपेजेसना योग्य, तटस्थ व अयोग्य अशा रीतीनं विभागणार आहे. तसेच अश्लील व जुगाराच्या साईट्ससंदर्भात तशी आगाऊ सूचना देण्यात येणार आहे. तसेच मुस्लीमांना लागणाऱ्या प्रार्थनेच्या वेळा, कुठल्या दिशेनं प्रार्थना करायची याची माहिती आदी बाबीही देण्यात येणार आहेत.

आम्ही जागतिक मूल्ये रूजवण्याचा प्रयत्न करणार असून मुख्यत: मुस्लीमांना लक्ष्य करण्यात येणार असलं तरी कुणीही हे अॅप वापरू शकतं असं हसनी यांनी सांगितलं आहे.