आपल्या तोंडातील लाळेमुळे चहा, कॉफी व धुरातील घटकांपासून आपले संरक्षण होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. आपल्या लाळेत एक संयुग असे असते जे रक्तातील प्रथिने व स्नायू, मानवी पेशी यांचे डीएनए बिघडवून टाकणाऱ्या रसायनांपासून संरक्षण करीत असते, असे संशोधनातून दिसून आले आहे.
चहा, कॉफी व धूर यात पायरोगॅलोल हा पॉलिफेनॉलचा प्रकार असतो व तो घटक घातकही असतो. त्याच्यापासून शरीराला हानी निर्माण होण्याची शक्यता असते. अमेरिकेतील किमेल कर्करोग केंद्राचे संशोधक स्कॉट केर्न यांनी म्हटले आहे की, आपल्या शरीरात पॉलफेनॉल पेशीत झिरपून आजारपण येऊ नये यासाठी नैसर्गिक यंत्रणा असते. या विषांचा शरीरात प्रसार होऊ शकतो. केर्न व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे दाखवून दिले की, रोजच्या अन्नात पॉलिफेनॉल असतात त्यामुळे डीएनएच्या धाग्यांचे तुकडे होण्याची भीती असते,
 त्यांच्या संशोधनानुसार या विषारी घटकांमुळे केमोथेरपी या कर्करोगात वापरल्या जाणाऱ्या पद्धतीपेक्षा वीस पट अधिक हानी होते.
   जर हे हानिकारक पदार्थ पसरले तर डीएनएला मोठे नुकसान पोहोचवू शकतात पण त्यांचा बिमोड हा लाळेतच केला जातो हे विशेष मानावे लागेल, असे केर्न यांचे म्हणणे आहे. लाळेतील अल्फा अमायलेज या विकर, रक्तातील प्रथिन अल्ब्युमिन व स्नायूतील प्रथिन मायोग्लोबिन यांच्यामुळे चहा, कॉफी व पॉलिफेनॉल यांच्यातील विषारी घटकांमुळे डीएनए तुटण्याची होणारी हानी टळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा