Dengue Symptoms & Cure: बिग बॉस १६ च्या या आठवड्याच्या वीकेंड धमाक्यात होस्ट सलमान खान दिसणार नसल्याचे समजतेय. ऐन दिवाळीच्या तोंडावर सलमानला डेंग्यूची लागण झाली असून तो अजूनही रिकव्हर होत आहे. सलमान ऐवजी यावेळी करण जोहर बिग बॉसच्या वीकेंड धमाक्यात घरातील सदस्यांची शाळा घेणार आहे. सहसा बॉलिवूड कलाकार, खेळाडू असे सर्वच सेलिब्रिटी हे आपल्या आहाराची, आरोग्याची पुरेपूर काळजी घेतात असे असतानाही सलमानला डेंग्यूची लागण झाली. हा खरंतर सावधानतेचा इशाराच आहे. ऑक्टोबर महिन्यातही पाऊस सुरु असल्याने देशभरात विविध आजारांच्या साथी पसरत आहेत, त्यात डेंग्यूचा धोकाही वाढतोय. अशावेळी आपण काय खबरदारी घ्यावी व डेंग्यूची नेमकी कोणती लक्षणे ओळखावीत हे आज आपण जाणून घेणार आहोत..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेंग्यूचा विषाणू व लक्षणे

एडिस इजिप्ती या संक्रमित डासाच्या चाव्यामुळे डेंग्यूचे विषाणू पसरतात. डास चावल्यानंतर जवळपास चार ते १० दिवसांमध्ये रुग्णामध्ये लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. रुग्णास डेंग्यू झाला असेल तर तीव्र ताप आणि अशक्तपणा जाणवतो. तसेच प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते. अगदी दुर्मिळ घटनांमध्ये डेंग्यूमुळे मृत्यू ओढवतो पण अन्यथा व्यवस्थित काळजी घेतल्यास डेंग्यूवर मात करता येते.

डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला?

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार मधुमेह, टीबी (क्षयरोग) तसेच कॅन्सरच्या रुग्णांना डेंग्यूचा सर्वाधिक धोका असतो. दुर्मिळ व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते त्यामुळे त्यांना डेंग्यूची लागण होण्याचा धोका अधिक असतो. डेंग्यूची लागण झाल्यास डायबिटीज रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वेगाने वाढू लागते ज्यामुळे हातापायाला तात्पुरते किंवा दीर्घकालीन अपंगत्व येण्याचा धोका असतो. डेंग्यूमुळे अचानक रक्तदाब कमी होऊ शकतो. विशेषतः वृद्ध व लहान मुलांना डेंग्यूचा सर्वाधिक धोका असतो.

एनीमियाची समस्या असलेल्या महिलांना सुद्धा डेंग्यूचा धोका असतो. अनेकदा डेंग्यूमुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. जर डेंग्यूची लागण झाली असेल आणि प्लेटलेट्सची संख्या २० हजाराहून कमी झाली असेल तर तात्काळ हॉस्पिटलला जाणे देणे हिताचे ठरेल.

डेंग्यूवर चुकूनही घेऊ नका ही औषधे

डॉक्टरांच्या माहितीनुसार डेंग्यूच्या रुग्णांनी अँटी बायोटिक व स्टेरॉइड असणारी औषधे घेऊ नयेत. अनेकजण डेंग्यूच्या तापला ओळखण्यात चुकतात व या लक्षणांना साधा ताप समजून अँटी बायोटिक्स घेतात मात्र डेंग्यू हा व्हायरल ताप असला तरी त्याची उपचार पद्धती वेगळी आहे. अशावेळी स्वतः डॉक्टर बनण्यापेक्षा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य उपचार घेत असताना अधिकाधिक द्रव पदार्थांचे सेवन करावे.

डेंग्यूच्या रुग्णाच्या शरीरात प्लाझ्मा ऐवजी चढवला मोसंबीचा ज्यूस; रुग्णाच्या मृत्यूनंतर ‘तो’ Video आला चर्चेत

(टीप: वरील लेख हा माहितीपर आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan down with dengue wont host bigg boss 16 watch symptoms of viral fever avoid these medicines svs