Salt Water On Face: ब्लॅकहेड्स, पिंपल्स, डाग या सगळ्यांचा मागमूस नसलेली चमकदार त्वचा हवी म्हणून अनेकजण मेहनत घेतात. यासाठी वेगवेगळे उपाय सांगणारे अनेक व्हिडीओ आपणही पाहिलें असतील. आज आपण चिमूटभर मीठ वापरून त्वचा स्वच्छ करण्याचा व्हायरल सल्ला काय आहे हे पाहणार आहोत. मीठाचे पाणी त्वचेचे छिद्र स्वच्छ करू शकते, ब्लॅकहेड्स काढून टाकू शकते आणि त्वचेला चमक देऊ शकते असे सांगणारी एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ब्युटी रेमेडीज पेजवर शेअर केलेली ही पोस्ट नेमकी काय आहे आणि त्याचा खरोखरच त्वचेला फायदा होऊ शकतो का हे आता आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नानावटी रुग्णालयातील त्वचाविज्ञान तज्ज्ञ आणि ट्रायकोलॉजिस्ट डॉ वंदना पंजाबी यांनी सांगितले की, मीठ थेरपीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ‘हॅलोथेरपी’ आणि दुसरी ‘वेट सॉल्ट थेरपी’ म्हणतात. “हॅलोथेरपीमध्ये, हेलो जनरेटर म्हणून ओळखल्या जाणार्‍या विशेष उपकरणांसह कोरडे मीठ त्वचेवर लावले जाते. वेट सॉल्ट थेरपीमध्ये, मिठाचा वापर गुळण्या करण्यासाठी, पिण्यासाठी, आंघोळ आणि नाक धुण्यासाठी पातळ द्रावणाच्या स्वरूपात केला जातो.”

आजवरच्या अनेक अभ्यासांमध्ये समोर आले की, सोरायसिस, एटोपिक डर्माटायटिस, पुरळ, रोसेसिया, बॅक्टेरियाचे संक्रमण यावरील उपचारांमध्ये हॅलोथेरपीची शिफारस केली जाते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा आणि लालसरपणाची तीव्रता कमी होते आणि त्वचेच्या सेल्सची पुनर्जन्म प्रक्रिया वेगाने होऊ शकते.

डॉक्टर मानसी शिरोलीकर, सल्लागार त्वचातज्ज्ञ आणि drmanasiskin.com च्या संस्थापक, यांनी मिठाच्या पाण्याने त्वचा स्वच्छ करण्याचे काही फायदे व तोटे नमूद केले आहेत.

फायदे

1)अँटी बॅक्टेरियल गुणधर्म: मिठाच्या पाण्यात नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेवरील विशिष्ट बॅक्टेरियाचा सामना करण्यास मदत करतात, यामुळे संक्रमण टळून मुरुमांची समस्यां कमी होण्यास मदत होऊ शकते.

2)एक्सफोलिएशन: मीठाचे कण सौम्य एक्सफोलिएंट म्हणून काम करू शकतात, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत होत असल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होऊ शकते.

3)तेलकट त्वचा असल्यास: खारट पाणी त्वचेचे नैसर्गिक तेल सेबमचे उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करू शकते. तेलकट किंवा पुरळ अधिक येणारी त्वचा असलेल्या व्यक्तींसाठी हे फायदेशीर ठरू शकते.

तोटे

1) कोरडेपणा: खारट पाणी त्वचेतील पाणी सुद्धा शोषून घेऊ शकते. याशिवाय त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकल्याने कोरडेपणा येऊ शकतो.

2)त्वचेची जळजळ: मिठाच्या पाण्याचा दीर्घकाळ किंवा वारंवार वापर केल्याने त्वचेच्या नैसर्गिक कामात अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे संवेदनशीलता आणि जळजळ वाढू शकते.

3)ओव्हर-एक्सफोलिएशनचा धोका: सौम्य एक्सफोलिएशन फायदेशीर असले तरी, मिठाच्या पाण्याने जास्त स्क्रबिंग होऊन लालसरपणा, त्वचेचे पापुद्रे निघणे असे त्रास होऊ शकतात.

4)त्वचेवर जळजळ होण्याची शक्यता: काही व्यक्ती खारट पाण्याबद्दल अधिक संवेदनशील असू शकतात, त्वचेवर डंक येणे, जळजळ होणे किंवा खाज सुटणे

हे ही वाचा<< स्प्राऊट्स खाण्याची योग्य पद्धत कोणती? कच्चे, वाफवलेले की… तज्ज्ञांनी सांगितलं हेल्दी सिक्रेट

दरम्यान,डॉ पंजाबी यांच्या म्हणण्यानुसार, डेड सी मधील मिठाच्या पाण्याच्या द्रावणात आंघोळ केल्याने त्वचेचा कोरडेपणा आणि जळजळ कमी होते, असे अभ्यासातून दिसून आले आहे, परंतु त्वचेची स्थिती सुधारण्यासाठी सामान्य मीठाच्या द्रावणाचा वापर केल्याचे पुरावे नाहीत. घरगुती मीठ त्वचेवर घासल्याने, जळजळ, त्वचा लाल होणे, हायपरपिग्मेंटेशन असे त्रास होऊ शकतात. तुम्हालाही हा प्रयोग करायचा झाल्यास आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salt water for face cleaning can help to remove black heads pimples gives brightness viral post answered by skin expert svs
Show comments