नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सने (एनसीपीए) वर्षातील बहुप्रतिक्षीत अशा एनसीपीए ‘समा : द मिस्टीक एक्स्टसी’ सुफी संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. 22 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित या तीन दिवसीय संगीत उत्सवात भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कलाकारांकडून सादर केल्या जाणार्या संगीत आणि नृत्य अदाकारीतून सुफी संस्कृतीचे दर्शन घडवण्यात येईल.
यावर्षी एनसीपीए समामध्ये संगीत आणि नृत्य कलेतील अनेक नामांकीत कलाकार सहभागी होउन आपल्या कलेचे दर्शन घडवणार आहेत. यामध्ये सलीम हसन चिश्ती अँड ग्रुप, संजुक्ता वाघ, इजिप्तीयन मावलवियाह ग्रुप यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य असेल ते म्हणजे उत्सवातील अंतिम कला प्रकार ज्यामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी सलीम-सुलेमान राजस्थानी लोककला संगीतकारांसमवेत संगीत मैफल सादर करतील.
संगीत उत्सवाबाबत माहिती देताना एनसीपीएच्या भारतीय संगीत विभागाच्या कार्यक्रम प्रमुख डॉ. सुवर्णलता राव यांनी सांगितले की, “एनसीपीएमध्ये आमच्या आश्रयदात्यांना सर्वोत्तम भारतीय संगीत कला प्रदान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समा हा संगीत उत्सव सर्व वयोगटातील संगीतशौकिनांमध्ये लोकप्रिय झाला आहे. या उत्सवात आबालवृध्दांना अद्वितीय सांस्कृतिक अनुभव प्राप्त होत असतो. यावर्षीच्या आयोजनातून सुफी संगीत संस्कृतीचा अनोखा अविष्कार अनुभवता येणार आहे.”
सुफीजम हे इस्लामचे एक रहस्यमयी परिमाण म्हणून ओळखले जाते. सुफीजममधून शांतता, सहिष्णुता आणि बहुवचनवाद यांचा प्रचार केला जातो. संगीताला प्रोत्साहन दिल्यामुळे ते तयार करणार्याशी नाते अधिक दृढ बनवता येत असते. इस्लामची एक रहस्यमयी शाखा म्हणून ओळखल्या जात असणार्या सुफी संगीतामधून श्रोत्यांना दैवाबरोबर जोडले गेल्याचा अनुभव प्राप्त होत असतो. निर्मात्याकडून सादर केले जात असणारी विरहाची वेदना हा सुफी गीत आणि संगीताचा प्रमुख गाभा असतो. समा’ संगीत उत्सवातून संगीत ऐकण्याचे आणि त्यात हरवून जाण्याची परिभाषा नव्याने अध्यात्मिक मार्गाने सादर केली जाणार आहे.
उत्सवाचा तपशील:
22 फेब्रुवारी 2019 रोजी वन ट्रूथ, मेनी पाथ्स हा कार्यकम एक्सपेरीमेंटल थिएटरमध्ये आयोजित ज्यामध्ये सुरेंद्रो, सौम्योजीत, सलीम हसन चिश्ती अँड ग्रुप विविध प्रकारच्या सुफी संगीताच्या मिश्रणातून विचारांची एकसलगता सादर करतील. हे कलाकार वैयक्तिक गीतांबरोबरच इतर सुफी कवी आणि गीतकारांची पारंपारिक सुफी गाणी गातील. यामध्ये पारंपारिक आणि समकालीन संगीत घटकांचे मधुर मिश्रण ऐकता येईल.
23 फेब्रुवारी 2019 रोजी एक्सपेरीमेंटल थिएटरमध्ये फकीर निमाना शहा हुसेन यांच्या गुढ कविता परिभाषीत करण्याचे अवघड सादरीकरण सादर करतील. शहा हुसेन यांनी 1538 ते 1599 या कालावधीत या सुफी पंजाबी कविता लिहल्या होत्या. या कविता संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून सादर केल्या जातील. शहा हुसेन यांच्या अतिशय दुर्मिळ अशा काफीज विविध प्रकारची रुपके आणि मूड्सच्या माध्यमातून नव्याने अविष्कारीत करतील. हे संगीत आणि नृत्य संजुक्ता वाघ, राधिका सूद नायक, हितेश धुतीया आणि विनायक नेटके यांच्याकडून सादर केले जाणार आहे.
23 फेब्रुवारी 2019 रोजी टाटा थिएटरमध्ये काइरोचा इजिप्तीयन मावलवियाह ग्रुप इव्हेंट होस्ट करतील. या कार्यक्रमात संगीत प्रस्तावनेसह व्हिरलींग डेरव्हीशेसने तयार केलेला अध्यात्मिक समाधान देणारा संगीत परफॉर्मनन्स सादर करण्यात येईल. यावेळी डेरव्हिशेसचे रंगीबेरंगी स्कर्ट्स परिधान केलेले कलाकार इजिप्तीयन मूळ असणारा तनौरा हा अभिनव नृत्य प्रकार दाखवणार आहे. या कलेच्या माध्यमातून मानवी आत्म्याचे शारीरिक, अध्यात्मीक आणि आत्मीक अंग उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
24 फेब्रुवारी 2019 रोजी जमशेद भाभा थिएटरमध्ये सुफीयाना गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या सादरीकरणात सलीम सुलेमान राजस्थानी लोक गायकांसह सुफी गीते सादर करतील. यामध्ये बॉलिवूडमधील गीतांसोबतच स्वतंत्र अल्बम्सचा समावेश असणार आहे. या अनोख्या संगीत मिश्रणात राजस्थानातील नवीन लोकगीत संगीतकार आपली कला सादर करणार आहेत. राजस्थान हा विभाग अनेक पंजाबी आणि सिंधी सुफी संतांनी लिहलेल्या लोकगीतांनी आणि कवितांनी समृध्द मानला जातो.