नेहमीच आपल्या युजर फ्रेंडली मोबाईल फोनसाठी चर्चेत असणाऱ्या सॅमसंगनं आपल्या ग्राहकांसाठी आता मोठी आनंदाची बातमी दिली आहे. सॅमसंगचे गॅलक्सी झेड फोल्ड 3 आणि गॅलेक्सी झेड फ्लिप 3 असे दोन नवीन फोल्डिंग स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहेत. टिपस्टर जॉन प्रोसर यांच्या मते सॅमसंगचे हे दोन्ही भन्नाट फीचर्सचे स्मार्टफोन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसं पाहाता हे दोन्ही स्मार्टफोन्स २७ ऑगस्ट रोजी लाँच होणार असल्याची चर्चा होती. मात्र, जर त्यांना मान्यता मिळण्याची प्रक्रिया लवकर झाली, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच म्हणजेच अंदाजे ३ ऑगस्ट रोजी हे दोन्ही स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे.
यात सॅमसंगच्या याआधीच्या फोल्डिंग मॉडेल्सच्या तुलनेत दररोज ५०,००० ते ७०,००० युनिट दराने गॅलेक्सी झेड फोल्ड 3 आणि झेड फ्लिप 3 ऑर्डर येत असल्याचं अहवालात सांगण्यात आलंय. तर मागील स्मार्टफोनच्या मॉडेल्सने १० ते २० लाख युनिट्सचा खप झाला होता. मात्र आता या नवीन फोल्डिंग स्मार्टफोनच्या लाँचिंगच्या इव्हेंटपूर्वीच या डिव्हाइसची 7 लाख युनिट्स तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काय आहेत भन्नाट फीचर्स!
मे २०२१ मध्ये आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेनुसार ‘गॅलेक्सी झेड फोल्ड 3’ मध्ये दोन फोल्डिंगच्या भागात कमी अंतर दिसून येणार आहे. तर हा स्मार्टफोन हिरवा, काळा, आणि सिल्वर या तीन रंगांमध्ये बाजारात लॉन्च होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. ‘सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 3’ या स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 फ्लॅगशिप चिपसेट च्या फिचरसह 4,275 एमएएच बॅटरी क्षमता असणार आहे. तर या सॅमसंग फोनसाठी प्रथमच एक फिकट फ्रेम, थिनर बेझल्स आणि फोनवर अंडर-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा असणार आहे.