सॅमसंग कंपनी आज (दि.1) आपला बहुप्रतिक्षित फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली असून यासोबतच एक टीझर व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात सॅमसंगने हा स्मार्टफोन पहिल्यांदा ग्राहकांसमोर आणला होता. परंतु, एप्रिल महिन्यात होणाऱ्या लॉचिंगपूर्वीच या फोनच्या फोल्डेबल स्क्रीनमध्ये काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे कंपनीनं या स्मार्टफोनचं लॉचिंग कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.

आणखी वाचा : मोबाईलमध्ये नेटवर्क येत नाही? या पाच गोष्टी करुन पाहाच

काय असू शकतात फीचर्स –
गॅलेक्सी फोल्डमध्ये 7.3 इंचाचा इंफिनिटी-व्ही फ्लेक्स डिस्प्ले आहे. तर फोल्ड केल्यानंतर छोटा 4.6 इंचाचा डिस्प्ले आहे. गॅलेक्सी फोल्डमध्ये 7nm प्रोसेसर 12GB रॅम असण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 16MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, एक 12MP टेलिफोटो कॅमेरा आणि दुसरा 12MP वाइड अँगल कॅमेरा असेल. हा फोन कॉसमॉस ब्लॅक आणि स्पेस सिल्वर रंगात उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे. ‘अँड्रॉइड 9.0 पाय’वर आधारित ‘सॅमसंग वन युआय’वर हा फोन कार्यरत असेल. फोनमध्ये 4,380mAh क्षमतेची बॅटरी असेल. या फोनसाठी स्वस्त व्हेरिअंट देखील कंपनी लाँच करणार असल्याचं वृत्त आहे.

किंमत –
भारतात या फोनची किंमत किती असेल याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र हा दीड लाख रुपयांच्या जवळपास या फोनची किंमत असू शकते.