स्मार्टफोनच्या बाजारपेठेतील आघाडीची कंपनी असणाऱ्या सॅमसंगने नुकतेच गॅलॅक्सी जे ७ प्लस हे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. या फोनची विशेष बाब म्हणजे यामध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. २ रियर कॅमेरे आणि एक फ्रंट कॅमेरा ही या नव्या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आहेत. सॅमसंगने गेल्या महिन्यात ड्युएल रियर कॅमेराचा पहिला फ्लॅगशिप गॅलॅक्सी नोट ८ फोन लाँच केला होता. त्यानंतर जे ७ प्लस या फोनची काही फिचर्स लिक झाली होती.

गॅलॅक्सीच्या नव्या जे सिरीजमधील या नव्या हँडसेटमध्ये १३ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचे दोन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. याशिवाय, विशेष म्हणजे फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. याशिवाय फिंगरप्रिंटची सुविधाही या फोनमध्ये देण्यात आली आहे.

एकूण तीन कॅमेरे देण्यात आल्यामुळे मुलाखत घेणे, एखाद्या विशिष्ट कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटिंग करणे, अशी कामे सोपी होणार आहेत. सध्या हा फोन थायलंडमध्ये लाँच करण्यात आला आहे. या ठिकाणी त्याची किंमत २८४०० रुपये आहे. येत्या काही दिवसांत हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठीही उपलब्ध करण्यात येईल, असे मानले जात आहे. भारतामध्ये याची किंमत २५ हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

गॅलक्सी जे ७ प्लसचे फीचर्स :

*  ५.५ इंच आकाराची स्क्रीन ४ जीबी रॅम

* ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज, २५६ जीबी एक्स्पांडेबल

*  १३/५ मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा, १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

*  ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी २० हा गतीमान प्रोसेसर

*  ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी