मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु आहे. आपल्या उत्पादनाचा बाजारात खप वाढावा यासाठी कंपन्या अनेक नवनवीन ऑफर्स जाहीर करतात. सध्या ऑनलाईन खरेदीही मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना बाजारात आपली उत्पादने खपावीत यासाठी सॅमसंगने आपल्या उत्पादनांच्या किंमतीत घट केली आहे. स्मार्टफोनच्या किंमती कंपनीने जवळपास ५ हजार रुपयांपर्यंत कमी केल्याने ग्राहकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सॅमसंग गॅलॅक्सी J 7 प्राइम हा फोन लाँच केल्यानंतर त्याची किंमत १८, ७९० रुपये होती. या किंमतीत ४, ८९० रुपयांची घट करण्यात आली असून तो आता ग्राहकांना १३,९०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. याबरोबरच सॅमसंग गॅलॅक्सी J7 नेक्स्ट हा फोन ११,४९० रुपयांना होता. त्याची किंमत आता १ हजार रुपयांनी कमी करण्यात आली असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. सॅमसंग गॅलॅक्सी J 7 प्राइम या फोनची फिचर्स आकर्षक असून ग्राहकांमध्ये या फोनची बरीच चलती आहे. ३ जीबी रॅम असलेल्या या फोनला ३२ जीबी मेमरी देण्यात आली आहे. याशिवाय २५६ जीबीपर्यंत ही मेमरी एक्पांड करता येते. मोबाईलचा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा असून अँड्रॉईड ६.०.१ हे व्हर्जन वापरण्यात येत आहे.

सॅमसंग गॅलॅक्सी J7 नेक्स्ट मध्ये ५.५ इंचाची स्क्रीन देण्यात आली असून याला एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची रॅम २ जीबी असून फोनची इंटरनल मेमरी १६ जीबी आणि एक्स्पांडेबल मेमरी २५६ जीबी आहे. या फोनमध्ये फ्लॅश असलेला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅश आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.