शाओमीनं जोरदार टक्कर दिल्याने मागे पडलेली सॅमसंग कंपनी आता गॅलेक्सी M सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे. आज या सीरिजमधील पहिले दोन स्मार्टफोन Galaxy M10 आणि M20 लाँच होणार आहेत. हे दोन्ही बजेट स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनबाबत चर्चा होती, कारण Infinity V वॉटरडिस्प्ले फीचर यामध्ये देण्यात आलं आहे.

आज संध्याकाळी 6 वाजेपासून अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर Galaxy M10 आणि M20 हे दोन्ही स्मार्टफोन उपलब्ध केले जातील. याशिवाय सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरवरही हे स्मार्टफोन उपलब्ध केले जाणार आहेत. या स्मार्टफोनच्या किंमतींबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, Galaxy M10 ची किंमत 8 हजार 990 रुपये आणि Galaxy M20 ची किंमत 12 हजार 990 रुपये असू शकते. Galaxy M10 हा स्मार्टफोन 2GB + 16GB व्हेरिअंट आणि 3GB + 32GB व्हेरिअंट अशा दोन प्रकारात उतरवला जाईल. अनुक्रमे 7 हजार 990 आणि 8 हजार 990 रुपये किंमत असू शकते. तर, M20 हा स्मार्टफोन 3GB + 32GB व्हेरिअंट आणि 4GB + 64GB अशा दोन प्रकारात उतरवला जाईल. अनुक्रमे 10 हजार 990 रुपये आणि 12 हजार 990 रुपये इतकी याची किंमत असू शकते. या दोन स्मार्टफोन्सनंतर कंपनी गॅलेक्सी एम (Galaxy M) सीरिजचे आणखी काही म्हणजे Galaxy M30 आणि Galaxy M40 हे फोन देखील लाँच करणार असल्याचं सांगितलं जातंय.

Galaxy M10 मध्ये 6.2-इंच HD+ डिस्प्ले आणि Galaxy M20 मध्ये FHD+ रिझोल्यूशनसह 6.3-इंच स्क्रीन असेल. M10 मध्ये 1.6GHz Exynos 7870 चा प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे, तर M20 मध्ये 1.8GHz Exynos 7904 प्रोसेसर असू शकतो.

Story img Loader