येत्या 10 मे रोजी अर्थात ‘मदर्स डे’निमित्त (Mother’s Day 2020) सॅमसंग कंपनीने एक शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत Galaxy Z Flip फोल्डेबल स्मार्टफोन आणि Galaxy S20 सीरिजच्या स्मार्टफोन्सवर कंपनीकडून ‘बेनिफिट्स’ दिले जात आहेत. ही ऑफर 4 मे ते 15 मेपर्यंत सुरू असणार आहे.

सॅमसंगने ‘मदर्स डे’निमित्त आणलेल्या या ऑफरमध्ये गॅलेक्सी झेड फ्लिप या फोनसोबत 11 हजार 300 रुपयांचे इअरबड्स केवळ 3 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. याशिवाय Samsung Galaxy S20 सीरिजचे स्मार्टफोन खरेदी केल्यास युजर्सना Samsung Care+ प्रोटेक्शन प्लॅनवर 50 टक्के सवलत दिली जात आहे. युजर्सना हा प्रोटेक्शन प्लॅन अवघ्या 1,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

याशिवाय Samsung Galaxy Z Flip खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त बेनिफिट्स देखील या ऑफरमध्ये आहेत. हा फोन खरेदी करताना 5,000 रुपये अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकते. ग्राहकांना EMI चा पर्यायही मिळेल. तसेच, एक वर्षाची अ‍ॅक्सीडेंटल स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन आणि Z प्रीमियर सर्विस देखील मिळेल. Samsung Galaxy S20 सीरीजचे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांनाही अतिरिक्त 5,000 रुपये डिस्काउंट मिळू शकते. याशिवाय HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 6,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि EMI चा पर्यायही आहे.

Story img Loader