Samudra shastra: आपल्याला कुणी सांगितले की, तू खूप नशीबवान आहेस. तर तुम्हांला कसं वाटेल हे ऐकून… नक्कीच खूप छान वाटेल. तुमच्या आयुष्यातील तुमचे भविष्य जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील अतोनात प्रयत्न करत असाल. परंतु म्हणतात ना की, हातावरील दडलेल्या रेषांमध्ये गुरफटलेले नशीब शोधण्यापेक्षा त्याच हातांनी मेहनत करून स्वतःचे नशीब लिहिणे, हेच उत्तम आहे. समुद्रशास्त्रानुसार, आपल्या चेहऱ्यावर असलेल्या वेगवेगळ्या खुणा आपलं नशीब दर्शवतात. नेमक्या त्या खुणा कोणत्या आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो, हे जाणून घेऊयात आणि आपणही या भाग्यवान सदरात मोडतो की नाही, ते पाहुया!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या खुणा कोणालाही आवडत नाही, परंतु चेहऱ्यावरील डिंपल प्रत्येकाला आवडते. हसताना गालात तयार झालेले डिंपल सर्वांना मोहित करतात. समुद्रशास्त्रात या चेहऱ्यावरील डिंपलला खूप भाग्यवान मानलं जातं. शास्त्रामध्ये असं म्हटलंय की, ज्या लोकांच्या गालावर डिंपल येत त्यांचे अतिशय चुंबकीय व्यक्तिमत्व असतं. गर्दीतही ते स्वतःची ओळख निर्माण करतात.

डिंपल असलेले लोक जोडीदारासाठी भाग्यवान असतात: समुद्रशास्त्रात असं नमूद केलं आहे की, गालावर डिंपल असणारे कोणतेही स्त्री किंवा पुरुष त्यांच्या जोडीदारांसाठी भाग्यवान असल्याचं सिद्ध होतं. त्यांच्या आयुष्यात प्रेम राहतं आणि ते आपल्या जोडीदाराला आदर आणि प्रेम देत असतात. डिंपल असलेले लोक त्यांच्या जोडीदाराशी एकनिष्ठ मानले जातात.

डिंपल असलेल्या लोकांच्या कुंडलीत शुक्र मजबूत : डिंपल असलेल्या लोकांच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो, जो त्यांना प्रत्येक पायरीवर आधार देतो. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे अशा लोकांना दूरदूरपर्यंत ओळखलं जातं आणि ते लोकांना लवकरच त्यांच्याकडे आकर्षित करतात.

डिंपल असलेले लोक पैशाच्या बाबतीतही भाग्यवान : ज्यांच्या गालावर डिंपल आहेत, समुद्रशास्त्रानुसार ते पैशांच्या बाबतीत भाग्यवान असतात. त्यांना पैशाची कधीच कमतरता भासत नसते आणि ते इतरांना मदतही करतात. समुद्रशास्त्रात असं सांगण्यात आलंय की, डिंपल असलेल्या मुली त्यांच्या सासऱ्यांना आर्थिक लाभ देखील देतात.

डिंपल असलेल्या मुलींच्या प्रेमात असतात त्यांचे पती : समुद्रशास्त्रात असं लिहिलं आहे की ज्या मुलींच्या गालावर डिंपल असतं अशा मुलींचे पती त्यांच्या प्रेमात असतात. त्यांचे पती अशा मुलींचं प्रत्येक म्हणणं ऐकत असतात. अशा मुली खेळकर आणि आनंदी असतात. यामुळे प्रत्येक क्षणी त्यांचे पती सुद्धा आनंदीत पहायला मिळतात. मुलांच्या बाबतीतही हेच लागू होतं. डिंपल असलेले पुरुष नेहमी आपल्या पत्नीला आनंदी ठेवतात आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samudra shastra people with dimple on cheeks are considered to be lucky for their partners prp