Samudrik Shastra Analysis: बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही नुसती म्हण नसून यामागे खरोखरच शास्त्रशुद्ध अर्थ दडला आहे. शरीर व व्यक्तिमत्व अभ्यासकांच्या माहितीनुसार आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाची रचना आपला मूळ स्वभाव कसा आहे याविषयी माहिती देत असते. शरीररचना व संबंधित अभ्यासाविषयी सामुद्रिक शास्त्रात सविस्तर माहिती दिलेली आहे. सहसा माणसाच्या शब्दांपेक्षा त्याचा चेहरा आपल्याला व्यक्तिमत्वाविषयी सांगून जातो असे म्हणतात पण तुम्ही अमुक परिस्थिती मध्ये कसे पाऊल उचलाल हे तुमच्या पायाच्या रचनेवरूनच ठरत असते. आजच्या या लेखात आपण आपल्या पायावरून आपला स्वभाव कसा ठरतो हे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामुद्रिक शास्त्रानुसार जगभरातील व्यक्तींच्या पायाच्या रचनेची ४ प्रकारात वर्गवारी करता येते. लांब पाय, रोमन पाय, ग्रीक पाय आणि चौकोनी पाय या प्रत्येक प्रकारची वेगवेगळी वैशिष्ट्य व माहिती पाहुयात..

रोमन पाय

ज्या व्यक्तीच्या पायाचा अंगठा व त्याबाजूच्या दोन बोटांची उंची समान असते अशी मंडळी रोमन पाय या गटात येतात. या गटातील व्यक्ती या अत्यंत बोलक्या स्वभावाच्या असतात, त्यांना मिळून मिसळून राहायला आवडते. अशा व्यक्तींना मित्र मैत्रिणी बनवण्यात वेळ लागत नाही.

ग्रीक पाय

जर का आपल्या पायाच्या अंगठ्याची उंची ही त्याच्या शेजारच्या बोटापेक्षा कमी असेल तर तुम्ही ग्रीक पायाच्या गटात मोडता. अशी मंडळी धनाच्याबाबत अगदी नशीबवान असतात. इतकेच नाही तर नेहमी काहीतरी हटके करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा व्यक्ती फार बोलक्या असतीलच असे नाही मात्र आपल्या कर्तबगारीने चारचौघात त्यांना स्वतःची ओळख निर्माण करता येते.

Samudrik Shastra: झोपण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव; पोटावर झोपणारे बिनधास्त तर पाय दुमडून..

लांब पाय

लांब पाय असं नाव असलं तरीही त्याचा आकाराशी फारसा संबंध नाही, उलट या गटातील व्यक्तींच्या पायाचा केवळ अंगठा उंचीने मोठा असतो व जोडून असणारी सर्व बोटं उतरत्या क्रमाने येतात. या व्यक्ती अलिप्त राहणे पसंत करतात, त्यांना आपले खाजगी आयुष्य कधीच इतरांसमोर बोलून दाखवायला आवडत नाही. तुम्ही त्यांना सार्वजनिक ठिकाणी केवळ औपचारिक संभाषण करतानाचा पाहू शकता.

चौरस पाय

चौरस पाय असणाऱ्या व्यक्तींच्या पायाची रचना ही अगदी दुर्मिळ असते. अशा मंडळींची अंगठ्यासहित सर्व बोटे एक समान असतात. या मंडळींचा स्वभाव लाघवी असतो मात्र त्यांना फार बोलण्यात रस असेलच असे नाही. फार मोजक्या जवळच्या व्यक्तींशी त्यांची मते जुळतात. असं असलं तरी तुम्ही त्याच्यावर बिनधास्त विश्वास ठेवू शकता.

(टीप- सदर लेख माहितीपर असून यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)