Sara Ali Khan Weight Loss: बॉलीवूड सेलिब्रिटी एखाद्या भूमिकेसाठी वजन वाढवतात, कमी करतात. काहींनी बॉलिवूड मध्ये येण्याआधीच प्रचंड मेहनत करून आपले वजन घटवल्याचे सुद्धा आपण ऐकले आहे. यातीलच एक नाव म्हणजे सैफ अली खानची लेक सारा अली खान. केदारनाथ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी साराचे वजन तब्बल ९६ किलो होते. कॉफी विथ करण मध्ये तिने सांगितले होते की, PCOS या आजारामुळे तिला वजन कमी करताना प्रचंड कष्ट घ्यावे लागले होते. कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना पिझ्झा, चॉकलेट आणि आइस्क्रीमच्या सततच्या सेवनाने तिचे वजन खूप वाढले होते. पण तरीही आपल्या करिअरमध्ये मोठे पाऊल पुढे ठेवण्याआधी तिने पूर्ण लुक चेंज केला. हे नेमकं कसं शक्य झालं त्यासाठी साराचा डाएट प्लॅन व व्यायामाचे रुटीन कसे होते हे पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सारा अली खान व्यायामाचे रुटीन (Sara Ali Khan Exercise)

सारा तिची लवचिकता सुधारण्यासाठी पिलाटीसवर भर देते. व्यायामाचा हा तिचा आवडता प्रकार असल्याचेही तिने सांगितले. अगदी क्वचित ती योगा व कथ्थकचा सरावही करते. जिममध्ये तिला विशेषतः कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग करावे लागते असेही ती सांगते.

सारा अली खान डाएट (Sara Ali Khan Diet)

सारा सांगते की, माझा आहार मात्र खूपच बदलला आहे. ती कोणत्याही प्रकारची साखर, कार्बोहायड्रेट किंवा अगदी दूध देखील घेत नाही. तिने अंडी आणि चिकनच्या स्वरूपात भरपूर प्रथिने आपल्या आहारात समाविष्ट केले आहेत. फॅट्सयुक्त ग्रीक योगर्ट आणि एक चिमूटभर कॉफी, हे आता आपल्यासाठी गोड खाणे आहे असेही सारा सांगते.

हे ही वाचा<< …म्हणून पायाच्या नसांना येऊ शकते सतत सूज; हृदय ‘हे’ संकेत देऊ शकतं, दुर्लक्षित करू नका!

दरम्यान, साराने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मला आठवतं की जिममध्ये मी एकदा 3 क्रंच केले आणि मी जाड असल्याने मला नंतर हलताही येत नव्हते. मी जिम सोडून घरी आले. मला वाटलं मला वजन कमी करणे कधीच शक्य होणार नाही पण मग काय झाले माहित नाही पण मी दुसऱ्या दिवशी उठले आणि पुन्हा जिममध्ये गेले तेव्हा मी 4 क्रंच केले आणि मग मी 5 केले आणि नंतर मी 6 केले आणि आता मी अक्षरशः क्रंच मारण्याची स्पर्धा लावू शकते.”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan weight loss how she lost 30 kgs with pcos diet plan and fitness routine to shred inches and kilos svs