देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी खास नववर्ष ऑफर दिली आहे. ज्या खातेदारांना पर्सनल लोन हवं आहे, अशा लोकांना या संधीचा फायदा उचलता येणार आहे. पर्सनल लोनवर ग्राहकांना सर्वाधिक व्याज भरावं लागतं. यासाठी कमी व्याज दर असलेल्या बँकांकडे खातेदार आपला मोर्चा वळवतात. मात्र एसबीआयच्या खातेदारांना आता इतरत्र जाण्याची गरज नाही. एसबीआयने खातेदारांना प्री अप्रूब्ड पर्सनल लोन ऑफर आणली आहे. याबाबतची माहिती एसबीआयने ट्वीट करून दिली आहे. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज नाही. तसेच कोणत्याही दस्तऐवजाची हार्ड कॉपी सबमिट करण्याची गरज नाही. कर्ज घेण्यासाठी, ग्राहकांकडे एसबीआयचे YONO अ‍ॅप असणे आवश्यक आहे, ज्यावर ते कधीही २४/७ कर्जासाठी अर्ज करू शकतात.यासाठी खातेदारांना काही साध्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसबीआयच्या या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना YONO अ‍ॅपवर जावं लागेल. जिथे वैयक्तिक कर्जावर विशेष सवलत दिली जात आहे. एसबीआय हे कर्ज झिरो प्रोसेसिंग फीवर देत आहे. एसबीआयने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. एसबीआय पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्जासह नवीन वर्षाची तयारी करा! तुम्ही योनो अ‍ॅपवर एसबीआय पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. त्याच वेळी, या संबंधित तपशील मिळविण्यासाठी, https://sbi.co.in/web/personal-banking/loans/personal-loans या लिंकवर क्लिक करा.

जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्यास पात्र आहात की नाही हे जाणून घ्यावं लागेल. कारण बँक काही निवडक ग्राहकांनाच पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज देणार आहे. यासाठी सर्वप्रथम, तुमच्या एसबीआयच्या जवळच्या शाखेला भेट द्या. तुम्हाला ऑफरचा लाभ मिळेल की नाही ते शोधा. ग्राहक याबाबतचा तपशील घरी बसून मिळवू शकतात. यासाठी ५६७६७६ या नंबरवर PAPL (SBI बचत बँक खात्याचे शेवटचे ४ अंक) संदेश पाठवा, त्यानंतर तपशील मिळतील.

वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचे?

  • सर्वप्रथम SBI YONO अ‍ॅप वर जा.
  • लॉग इन करा.
  • ड्रॉप डाउन मेनूमध्ये Avail Now निवडा .
  • कर्जाची रक्कम आणि टाइम पीरियडबाबत लिहा.
  • त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, तो तिथे अ‍ॅड करा.
  • कर्जाचे पैसे जमा केले जातील.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi offer personal loan for customer at 9 60 percent know process rmt