भारतीय वंशाचा एकाचा सहभाग असलेल्या शास्त्रज्ञांच्या चमूने इंटरनेटच्या साह्याने इतरांच्या मेंदूचा ताबा मिळवण्याचा यशस्वी प्रयोग केला. इंटरनेटच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या हालचाली आता नियंत्रित करता येणार आहेत.
विद्युत आणि चुंबकीय उत्तेजनाच्या साह्याने वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक राजेश राव यांनी त्यांचे सहकारी अँन्ड्रेआ स्टोक्को यांच्या मेंदूला इशारा केल्यावर स्टॉक्को यांची बोटे कॉम्प्युटरच्या की-बोर्डवर फिरू लागली.
दरम्यान, ड्यूक विद्यापीठाच्या संशोधकांनी दोन उंदरांमध्ये मेंदू ते मेंदू असा संवाद घडवून आणला. हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी हा प्रयोग उंदीर व माणसामध्ये केला. राव आणि स्टोक्को यांच्या मते दोन व्यक्तींच्या मेंदूंमध्ये सरळ संवाद घडवण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.
“इंटरनेटच्या माध्यमातून आतापर्यंत दोन संगणक जोडले जात होते. मात्र, आता इंटरनेटच्या साह्याने दोन मेंदू जोडता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्हाला एका मेंदूकडून ज्ञान घेऊन ते सरळ दुसऱ्या मेंदूकडे पोहोचवायचे आहे”, असे वॉशिंग्टन विद्यापीठाच्या मेंदू विज्ञान संस्थेचे मानसशास्त्राचे सहायक प्राध्यापक टोक्को म्हणाले. प्रयोगशाळेमध्ये इलेक्ट्रोडची कॅप घालून इलेक्ट्रोएनसेफॅलोग्राफी मशीनच्या साह्याने मेंदूतील विद्युत हालचालींचे निरीक्षण करता येत असल्याचे प्रात्यक्षिक राव करतात.

Story img Loader