Sex After Heart Attack: हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे अनेक प्रसंग मागील काही काळात आपण ऐकले आहेत. हृदयासंबंधी विकारामुळे अनेक नामवंत कलाकार, राजकीय नेते व प्रख्यात व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत. आजच प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले त्यांनाही काही दिवसांपूर्वी कार्डियाक अरेस्टचा त्रास झाला होता. ही उदाहरणे पाहता हृदयविकार हा विषय अनेकांच्या मनात भीती निर्माण करत आहे. समजा एखाद्याला असा हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल त्या व्यक्तीला तर प्रत्येक गोष्ट करण्याआधी दहा वेळा विचार करावा लागतो. अगदी शारीरिक संबंध ठेवण्याबाबतही अनेकांच्या मनात प्रश्न असतात. हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यावर सेक्स करावा का याविषयी तज्ज्ञांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोर्टिस हॉस्पिटलचे मानसशास्त्र सल्लागार व सेक्सॉलॉजिस्ट डॉ संजय कुमावत यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतरही तुमचे स्वास्थ्य लक्षात घेऊन शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी दिली जाते. जरी एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे तरी त्याच्या लैंगिक क्षमतांवर याचा काहीही परिणाम होत नाही. मात्र अशा शस्त्रक्रियांनंतर स्नायूची शक्ती व सहनशक्ती कमी होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून डॉ. रेखा राधामणी यांनी सांगितलेले काही आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करण्याचा साला दिला जातो. स्नायूंच्या मजबुतीसह यामुळे स्टॅमिना वाढण्यासही मदत होते.

हृदयाची मजबुती व स्टॅमिना वाढवणारे पदार्थ

डाळिंब: डाळिंबामुळे जननेंद्रियांना रक्तपुरवठा होतो व कामेच्छा वाढते. विशेषतः डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने स्त्री व पुरुष दोघांमधील टेस्टोस्टेरोनचे प्रमाण सुधारते.

खजूर : लैंगिक समस्यांवर खजूर हा नामी उपाय आहे. यात उपलब्ध व्हिटॅमिन व मिनरल्स कामेच्छा वाढवण्यात मदत करतात.

शेवगा: शेवग्याच्या पाल्याची भाजी व फुलांचे सेवन हे सेक्श्युअल हेल्थसाठी फायदेशीर मानले जाते. विशेषतः स्पर्म काउंट म्हणजेच शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी शेवग्याचे सेवन पुरुषांनी करण्याचा सल्ला डॉ. राधामणी देतात.

Sex Helps In Anti Aging: ‘सेक्स’मुळे मी आजही तरुण; अनिल कपूर यांच्या ‘त्या’ विधानावर डॉक्टरांचं मत जाणून घ्या

हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपल्या हृदयाचा आकार मुठीच्या बरोबरीचा आहे. आकुंचन आणि विस्तार करण्याच्या क्रियेमुळे, आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये सतत रक्ताचा प्रवाह असतो. बैठ्या जीवनशैलीमुळे हृदयाची ताकद कमी होते आणि परिणामी एखाद्या आकस्मिक घटनेत किंवा अचानक तणाव वाढल्यास हृदय सहन करू शकत नाही व हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराच्या झटक्यानंतर जीवनशैलीत नक्कीच काही बदल करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sex after heart attack can heart patients do physical intercourse after cardiac arrest know what doctor says svs