Sex Benefits For Anti Aging: करण जोहरचा चॅट शो कॉफी विथ करण मध्ये सेलिब्रिटींच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळते. बॉलिवूड गॉसिपबाबत एकापेक्षा एक धक्कादायक खुलासे करणारा हा शो नेहमीच चर्चेत असतो. यंदा या शो मध्ये पाहुणा म्हणून अनिल कपूर यांनी हजेरी लावली आणि केवळ एका वाक्यात अख्ख्या सीझनचा भाव ते खाऊन गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कोणत्या तीन गोष्टींमुळे तुम्ही अधिक तरुण दिसता?” असा प्रश्न करणने अनिल यांना विचारताच “सेक्स, सेक्स, सेक्स.” असं म्हणत अनिल आपल्या एव्हरग्रीन लुकचे श्रेय सेक्सला देताना दिसून आले. अनिल कपूर यांचं हे वाक्य सर्वांनी मस्करी म्हणून घेतलं असलं तरी सुदृढ आरोग्य व सेक्स यांचा खरंच काही संबंध आहे का हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत.

सेक्स व फिटनेसचा संबंध आहे का?

यापूर्वी अनेकदा सेक्स व आरोग्य यांचा परस्परसंबंध दर्शवणारे काही लेख प्रसिद्ध झाले आहेत. १९८२ साली जेरोन्टोलॉजिस्ट नामक एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखामध्येही याचा उल्लेख दिसतो. यानुसार पुरुषांमध्ये शारीरिक संबंधांची वारंवारता व महिलांसाठी शारीरिक संबंधांमधून मिळणारे सुख या घटकांचा प्रभाव त्यांच्या वयात दिसून येतो. इंस्टीट्यूट ऑफ अँड्रोलॉजी एंड सेक्श्युअल हेल्थचे संस्थापक डॉ. चिराग भंडारी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, नियमित शारीरिक संबंध ठेवणाऱ्या स्त्री व पुरुषांना इतरांपेक्षा तुलनेने अधिक तरुण व उत्साही वाटते.

काय म्हणाले होते अनिल कपूर?

दरम्यान, डॉक्टर भंडारी यांच्या माहितीनुसार, सेक्सनंतर शरीरातील एंडोर्फिन म्हणजेच आनंदी हार्मोन्सचे प्रमाण वाढते. नियमित शारीरिक संबंध अनुभवत असल्यास टेस्टोस्टेरोन हार्मोन्समध्येही वाढ होते, ज्याला अँटी एजिंग हार्मोन म्हणूनही ओळखले जाते. आपला मूड ठरवण्यासाठी टेस्टोस्टेरोन हे हार्मोन मोलाची भूमिका बजावते. केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक स्वास्थ्यासाठीही टेस्टोस्टेरोनची मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sex helps in anti aging says evergreen anil kapoor is physical relation and fitness related check what doctor says svs