डिझायनर डॉनाटेल्ला वर्साचेच्या मते स्त्रीने परिधान केलेल्या शरिराला घट्ट बसणा-या कपड्यांच्या वापरातून तिचा आत्मविश्वास प्रकट होतो. अशा प्रकारचे कपडे परिधान केलेली स्त्री तिच्या शरिरीक अंगकाठीबाबत खूष असल्याचे दिसून येते.
कॉन्टॅक्टम्युझीकने दिलेल्या वृत्तानुसार या ५८ वर्षीय फॅशन डिझायनरने गेल्या शुक्रवारी ‘मिलान फॅशन वीक’मध्ये शरिराला घट्ट बसणा-या कपड्यांचे नवीन कलेक्शन प्रस्तुत केले.
ती म्हणाली, माझे हे कलेक्शन तुमच्यातला आत्मविश्वास दर्शविते. जेव्हा तुम्ही ठराविक प्रकारचे कपडे आत्मविश्वासाने परिधान करता, तेव्हा तुम्ही तुमच्या योजना अधिक आत्मविश्वासाने सादर करता आणि तुमच्या कल्पना आणि तुमची मते अधिक धाडसाने मांडता. सेक्सी कपडे फक्त ‘सेक्सी लुक’ न दर्शविता, तुमचा धडसी स्वभाव आणि धीटपणा दर्शवितात. तुमचे हे धाडसी व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तिला जाणिव करून देते की त्याला कोणत्या व्यक्तीला सामोरे जायचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा