शाम्पू आज आपल्या हेअर केअर रुटीनचा खूप मोठा भाग बनले आहेत. शाम्पूच्या पुष्कळ व्हरायटी आणि टाइप आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. यामुळे आता आपल्याला विचार करावा लागतो की, आपल्यासाठी कोणता शाम्पू बेस्ट आहे आणि कोणता नाही. मार्केटिंगच्या या काळात प्रत्येक कंपनी आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून हा दावा करत असते की, त्याचे प्रोडक्टच सर्वात बेस्ट आहे.अनेकांना रोज वापरला जाणारा शॅम्पू सॅशेच्या रूपात विकत घ्यायला आवडत, तर अनेकांना त्याची बाटली आणायला आवडते. अनेकांचा पैसे वाचवणे हेही यामागचा तर्क असतो. तुम्हालाही कधीतरी प्रश्न पडला असेल की, शॅम्पूचे सॅशे खरेदी करणं अधिक फायदेशीर आहे की शॅम्पूची मोठी बॉटल?
खूप लोकांचा असा विश्वास आहे की सॅशे खरेदी करणे स्वस्त आहे, तर काही लोक बाटलीच फायदेशीर मानतात. चला तर आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया सॅशे की बॉटलमध्ये जास्त शॅम्पू असतो.
शॅम्पूचे पाऊच की एक बॉटल
पाऊच आणि बाटल्या या दोघांपैकी कशात शॅम्पू जास्त आहे यावर अनेकदा वाद होत असतो. यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये या गोष्टीची वास्तविकता चाचणी केली गेली आहे. एका व्हिडिओमध्ये, एका युट्युबर सुमारे ५०० रुपयांना शॅम्पूची बाटली खरेदी करतो आणि त्याच रकमेमध्ये त्याच शॅम्पूचे पाउच खरेदी करतो. दोन्ही शॅम्पूचे वजन केले असता धक्कादायक आकडेवारी समोर आली. प्रत्यक्षात, या तपासणीत असे आढळून आले की बाटलीतून ६०० मिली शॅम्पू मिळाला, त्याच रकमेत घेतलेल्या शॅम्पू सॅशेमधून १ लिटरपेक्षा जास्त शॅम्पू निघाला.
हेही वाचा – ‘या’ वयात करा लग्न; दीर्घकाळ टिकेल नातं; वाचा संशोधन काय सांगते …
पाउचमध्ये/सॅशेमध्ये जास्त शॅम्पू
यावरून हे स्पष्ट होतं की, जर तुम्ही पाउचमध्ये/सॅशेमध्ये शॅम्पू खरेदी केला तर शॅम्पू जास्त मिळतो, जे खूप फायदेशीर आहे. पाऊचमधील शॅम्पू खरेदी करुन तुम्ही कमी पैशात बॉटलपेक्षा जास्त शॅम्पू खरेदी करू शकता. शॅम्पूच्या सॅशेमध्ये बॉटलपेक्षा जास्त शॅम्पू मिळतो.