शनि ग्रहाचा राशी बदल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. शनि ग्रह मकर राशीत असून २९ एप्रिल २०२२ रोजी आपली राशी बदलेल. शनि ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. ५ जून २०२२ रोजी शनि ग्रह वक्री होणार आहेत आणि मकर राशीच गोचर करणार आहेत. १७ जानेवारीपर्यंत या राशीत शनि ग्रह विराजमान असतील. शनि ग्रहाचा प्रभाव कोणत्या राशीवर कसा असेल जाणून घेऊयात.
शनि साडेसाती २०२२: वर्षाच्या सुरुवातीपासून एप्रिलपर्यंत धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांची शनिची साडेसाती असेल. त्यानंतर २९ एप्रिल रोजी जेव्हा शनि राशी बदलणार आहे. तेव्हा धनु राशीच्या लोकांना शनिच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तर मीन राशीच्या लोकांना शनिची साडेसाती सुरू होईल. याशिवाय मकर राशीच्या लोकांना शेवटची अडीच वर्षे तर कुंभ राशीच्या लोकांवर शनि साडेसातीचा पाच वर्षांचा कालावधी उरेल. १२ जुलै २०२२ ते १७ जानेवारी २०२३ पर्यंत शनि मकर राशीत भ्रमण करेल. शनि वक्री होत असल्याने या काळात मीन राशीच्या लोकांना दिलासा मिळेल. मात्र धनु राशीचे लोक पुन्हा शनिच्या दशेत येतील.
Astrology: जानेवारी २०२२ मध्ये मकर राशीत दोन शत्रू ग्रह एकत्र; या पाच राशींना मिळणार शुभ फळ
शनि ढय्या २०२२: वर्षाच्या सुरुवातीपासून २९ एप्रिलपर्यंत मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर शनि ढय्या राहील. त्यानंतर २९ एप्रिलला जेव्हा शनि कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनिची ढय्या सुरु होईल. या दरम्यान मिथुन आणि तूळ राशीचे लोक यापासून मुक्त होतील. शनि वक्री असल्यामुळे असं होईल. त्यानंतर १२ जुलै २०२२ ते १७ जानेवारी २०२३ या कालावधीत शनि पुन्हा मकर राशीत असेल. त्यामुळे मिथुन आणि तूळ राशीला ढय्या असेल. या दरम्यान कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनि ढय्यापासून दिलासा मिळेल. त्यानंतर १७ जानेवारी २०२३ पासून शनि कुंभ राशीतून पुन्हा भ्रमण करतील. त्यामुळ या दोन राशींनी पुन्हा शनिची ढय्या सहन करावी लागेल.