हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार शनिची साडेसाती आणि महादशा प्रभाव व्यक्तींवर पडत असतो. प्रत्येक राशीला काही कालावधीनंतर शनि महाराजांची साडेसात वर्षे साडेसाती सहन करावी लागते. काही जणांना कालावधी कठीण असतो. त्यामुळे शनीची साडेसाती म्हटलं की अनेकांना घाम फुटतो. २९ एप्रिल २०२२ रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. दर अडीच वर्षांनंतर शनि साडेसाती एक रास पुढे जाते. त्यामुळे मीन राशीचे लोक शनिच्या साडेसातीखाली येणार आहेत. हिंदू धर्मात अनेक जण कुंडलीनुसार असतात. दो, दू, दे, थ, झ, चा, ची या अक्षरांपासून सुरु होणारी नावं मीन राशीची असतात. ही जलतत्व असलेली राश असून स्वामी गुरु आहे.

२०२२ मध्ये शनीच्या राशी बदलामुळे मीन राशीच्या अडचणी वाढू शकतात. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तब्येतही थोडी खराब राहील. या काळात प्रत्येक कामात काळजी घ्यावी लागेल. हाडांना दुखापत होऊ शकते. अचानक वाढलेल्या खर्चामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. मात्र, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरेल. काही नवीन मित्र बनू शकतात. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून किंवा मोठ्या भावंडांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

स्वतःचा व्यवसाय चालवणाऱ्या मीन राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण अनुकूल नाही. धनहानी होण्याची शक्यता राहील. या दरम्यान, कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी, आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. शनिवारी संध्याकाळी मजुरांना कपडे दान करा. जेणेकरुन शनिदशाचा तुमच्यावर वाईट परिणाम होणार नाही. यासोबतच प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीवर मोहरीचे तेल अर्पण करावे. २९ एप्रिल २०२२ पासून मीन राशीच्या लोकांची शनि साडेसती सुरू होईल, धनु राशीच्या लोकांची यापासून सुटका होईल. याशिवाय कुंभ राशीच्या लोकांवर शनि सतीचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि मकर राशीच्या लोकांसाठी शेवटचा टप्पा सुरू होईल.

Story img Loader