असे म्हटले जाते की, शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवी संपत्तीचा वर्षाव करते, असे मानले जाते की, या दिवशी लक्ष्मी देवी पृथ्वीवर फिरत असते. शास्त्रानुसार, या दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणून हा दिवस लक्ष्मीचा प्रकट दिवस मानला जातो. शरद पौर्णिमेला रात्री लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. आई लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप खास आहे. याकरिता या दिवशी लोक देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध उपाय करतात. असे म्हटले जाते की हे उपाय केल्याने घर संपत्तीने भरलेले राहते. यावेळी १९ ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा आहे. या पोर्णिमाला कोजागरी पौर्णिमा असे देखील म्हणतात. या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीला कसे प्रसन्न करू शकता हे जाणून घेऊयात.
– शरद पौर्णिमेला सकाळी उठल्यावर, आंघोळ केल्यानंतर स्वच्छ पाटावर लाल कापड घालून देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. यानंतर मातेची विधिवत पूजा केल्यानंतर लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. असे म्हटले जाते की शरद पौर्णिमेच्या दिवशी या स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते, ज्यामुळे तुमचे घर संपत्ती आणि धान्याने परिपूर्ण होते.
– सनातन धर्मात, सुपारीच्या पानांना पूजेमध्ये खूप महत्त्व दिले जाते कारण सुपारीला अत्यंत पवित्र आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि देवीला पान अर्पण करा. नंतर ते पान घरातील सदस्यांमध्ये प्रसाद म्हणून वाटा. यामुळे घरात सुख आणि समृद्धी राहते.
– शरद पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून घराची स्वच्छता आणि स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करा आणि देवीला पांढरी मिठाई किंवा केशर खालून बनवलेली खीर प्रसाद म्हणून अर्पण करा. यानंतर संध्याकाळी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करा. यामुळे श्री लक्ष्मीसह श्री हरीची कृपाही प्राप्त होते. तुमच्या घरात अखंड समृद्धी राहते.
– असे मानले जाते की देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाच्या कवड्या खूप आवडतात. म्हणून शरद पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या कवड्यांचा समावेश करा. पूजेच्या ठिकाणी किमान पाच कवड्या ठेवा आणि पूजा संपल्यावर लाल रंगाच्या कपड्यात बांधून या कवड्या तुमच्या कपाटात ठेवा. याने तुमच्या घरात संपत्तीची भरभराटी राहते.