Kojagiri Purnima 2024 Wishes Status : नवरात्रोत्सव आणि विजयादशमीचा सण पार पडल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. संपूर्ण देशभरात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. यंदा १६ ऑक्टोबर (बुधवार) रोजी साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून ही ओळखली जाते. कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे चंद्रप्रकाश नेहमीपेक्षा लख्ख असतो म्हणून यावेळी चंद्राचे एक साजरे रूप पाहायला मिळते. या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. तसेच चंद्रप्रकाशाचे प्रतीक म्हणून दुधाचे प्राशन केले जाते. या दिवशी चंद्राच्या प्रकाशात ठेवलेलं दूध हे चंद्राच्या तत्वाने बनलेलं असतं. दूध हे पूर्णान्न आहे. त्यामुळे दुधाचे सेवन करणं योग्यचं आहे. हेच कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आहे.
या वर्षी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त WhatsApp स्टेटसवर ठेवून प्रियजनांना शुभेच्छा देत या सणाचा आनंद साजरा करू शकता. त्यासाठी खास तुमच्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या मराठीतून शुभेच्छा आणि संदेशांची यादी तयार केली आहे. त्यातील तुम्हाला आवडतील त्या शुभेच्छा तुम्ही प्रियजनांना पाठवू शकता.
कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा (Kojagiri Purnima Wishes In Marathi)
१) दूध केशरी, चंद्र – चांदणे, कोजागिरीचे रूप आगळे…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
२) चांदण्यांत न्हाऊन निघाली चांदरात, कोजागिरीच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश…,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
३) मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
४) कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माझ्या संपूर्ण परिवाराकडून आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा!
५) आज कोजागिरी पौर्णिमा हा सण तुम्हाला सुख-समाधानकारक आणि आनंदाची उधळण करणारा असावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा मराठी स्टेट्स (Kojagiri Purnima Status In Marathi)
१) कोजागिरीचा चंद्र गालात हसत होता, गुणगुणत वाऱ्यासवे झुल्यावरी झुलत होता.
२) आकाशगंगा तेजोमय झाली, नभात चंद्रफुलांची उधळण झाली, कोजागिरीचा चंद्र पाहण्या वसुंधराही आतुर झाली…
३) कोजागिरीचा चंद्र जसा चांदण्यांसमवेत रमतो, त्याला पाहताच मला तुझा भास होतो… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
४) चांदण्यांच्या संगतीने चंद्र करी रासलीला, मुग्ध धरती सारी रंगली पाहून त्यांना… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा – धनत्रयोदशीपूर्वी ‘या’ राशींचे लोक होणार मालामाल, बुधदेवाच्या आशीर्वादाने नोकरीत मिळणार आर्थिक लाभ
५) चंद्राचा नूर आज दिसेल खूप खास. कारण… कोजागिरीची रात्र आहे आज… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
६) कोजागिरीच्या चंद्राची किरणे खेळत होती पाण्यात, चांदणी रात पसरली होती धरती आणि अंबरात… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
७) थकलेला दिनकर मग हळू हळू निद्राधीन होतो, आभाळाच्या पटलावरतील कोजागिरीचा चंद्र उगवतो… कोजागिरीच्या शुभेच्छा!
८) कितीही रात्री जागल्या तरी पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही आणि प्रेमात हरलेल्या लोकांसाठी कोजागिरीची बासुंदीही गोड नाही…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
९) केशरयुक्त दुधाची चवदार साथ, ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात, म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान, दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!