सर्वत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. यावर्षी २६ सप्टेंबरपासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्री साजरी केली जाणार आहे. या नऊ दिवसांमध्ये भक्तीभावाने देवीची पूजा आणि आराधना केली जाते. बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. यावेळी शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे. त्यासाठी फळं किंवा फळांचा रस घेतला जातो. पण जर मधूमेह असणाऱ्या व्यक्ती उपवास करणार असतील तर त्यांना डाएटकडे विशेष लक्ष द्यावे लागते. काही फळं नैसर्गिकरित्या गोड असतात, त्यामुळे अशा फळांचे अतिसेवन रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. अशावेळी मधूमेह असणाऱ्या रुग्णांनी कशाप्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी जाणून घ्या.
मधूमेह असणाऱ्या व्यक्तींनी नवरात्रीचे उपवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा
Hair Care Tips : टक्कल पडण्याची भीती वाटतेय का? ‘हे’ उपाय करून पाहा नक्की दिसेल फरक
खूप वेळ उपाशी राहू नका
योग्य वेळेच्या अंतराने अन्नपदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जास्त वेळ उपाशी राहू नये असा सल्ला दिला जातो. अशात जर या व्यक्ती उपवास करणार असतील तर त्यांनी थोड्या वेळाच्या अंतराने काही हेल्दी पदार्थ खावे.
जास्त चहा पिणे टाळा
मधूमेह असणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अति चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो उपवासातही मधुमेह असणाऱ्यांनी जास्त चहा पिणे टाळावे. चहा व्यतिरिक्त तुम्ही लस्सी, ताक, नारळाचे पाणी, लिंबू पाणी पिऊ शकता.
औषधं वेळेवर घ्या
उपवासादरम्यान रोजचा आहार घेत नसल्याने मधूमेहाचे रुग्ण औषध घेणं टाळतात, परंतु याचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर औषधं, इन्सुलिन डोस घेणे आवश्यक आहे.
तेलकट पदार्थ खाणे टाळा
नवरात्रीमध्ये बहुतेक अन्नपदार्थ तळलेले असतात. तळलेले अन्नपदार्थ जास्त खाण्याऐवजी फक्त उकडलेले, भाजलेले, वाफेवर शिजवलेले पदार्थ खावेत. तुम्ही भाजलेले किंवा उकडलेले रताळे मर्यादित प्रमाणात खाऊ शकता. याशिवाय कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाऊ शकता.
Platelets Foods : ही फळं आणि भाज्या आहेत प्लेटलेट्सचे नैसर्गिक स्रोत; पाहा यादी
डॉक्टरांचा सल्ला घ्या
उपवास करण्यापुर्वी मधूमेह असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)