Shehnaaz Gill Diet Plan : रिॲलिटी शो ‘बिग बॉस सीझन १३’ची सर्वात लोकप्रिय सदस्य म्हणून ओळखली जाणारी शहनाझ गिल सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. बिग बॉसनंतर तिच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. दिलखुलास स्वभावामुळे दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या सोशल मीडियावर वाढत आहे. तिने या दरम्यान स्वत:मध्ये खूप बदल घडवून आणला. मॉडेल, गायक व अभिनेत्री असलेली शहनाझ गिलने लॉकडाऊनदरम्यान तिचे वजन कमी केले. तिने काही मुलाखतींमध्ये तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी सांगितले आहे.

मिर्ची प्लसवर शिल्पा शेट्टी कुंद्राबरोबरच्या एका मुलाखतीत, शहनाझने सांगितले, तिने लॉकडाउनदरम्यान सहा महिन्यात ५५ किलो वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि सहा महिन्यानंतर तिने लोकांना तिचे नवीन व्हर्जन दाखवले.

सकाळचा नाश्ता

ती तिच्या दिवसाची सुरुवात ॲपल सायडर व्हिनेगर, एक कप चहा आणि हळदीच्या पाण्याने करते. नाश्त्यामध्ये ती मूग, डोसा किंवा मेथी पराठा खाते. ती नेहमी नाश्त्यात जास्तीत जास्त प्रोटिन खाण्यावर भर देते.

पोह्याची रेसिपी

टाईम्स फुडीला दिलेल्या एका मुलाखतीत, तिने पोह्यांची रेसिपी सांगितली होती. ती नाश्तात पोहे बनवताना – सुरुवातीला एका कढईत तेल गरम करते. त्यात जिरे, मोहरी घालते, मूठभर पोहे घालण्यापूर्वी बारीक चिरलेली भोपळी मिरची, ब्रोकोली आणि गाजर यांसारख्या भाज्या त्यात टाकते आणि चांगले परतून घेते. त्यानंतर पोहे टाकते. ती भाज्या जास्त आणि पोहे कमी खाते. यासह ती एक वाटी ग्रॅनोला आणि दह्याचेसुद्धा सेवन करते.

दुपारचे जेवण

तिच्या दुपारच्या जेवणात ती एक वाटी डाळ, स्प्राउट सॅलेड आणि टोफू स्क्रॅम्बल, तुपाची रोटी इत्यादी खाते. या जेवणाच्या ताटात प्रोटिन्स, कार्ब्स आणि फायबर देणाऱ्या सर्व घटकांचा समावेश आहे.

संध्याकाळचा स्नॅक

तिच्या संध्याकाळच्या स्नॅकसाठी ती कढईत थोडे तूप गरम करते आणि त्यात कमी कॅलरीयुक्त मखाना किंवा फॉक्स नट्समध्ये टाकते आणि हाच नाश्ता ती बाहेरच्या शूटदरम्यान खाण्यासाठी घेऊन जाते.

रात्रीचे जेवण

रात्रीच्या जेवणात ती खिचडी त्याबरोबर एक वाटी दही आणि दुधी भोपळ्याचं सूप पिते, जे शरीराला पोषक, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स पुरवतात.

Story img Loader