आपल्या स्वयंपाकघरात अनेक औषधी पदार्थ दडून बसलेले असतात. मात्र त्यांचा योग्य पद्धतीने आपल्या शरीरासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी कसा वापर करून घ्याचा हे आपल्याला माहित नसते. आता आपल्या साध्या बटाट्याचेच उदाहरण घ्या. या भाजीपासून आपण कितीतरी स्वादिष्ट पदार्थ बनवतो. भजी, वडे, कटलेट, पॅटिस, वेफर्स काय आणि काय.. परंतु तुम्हाला माहीत आहे का, या बटाट्याचा वापर तुम्ही तुमच्या केस आणि त्वचेसाठीदेखील करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झोपण्याआधी फोन बघणे, योग्य प्रमाणात झोप न घेणे, यामुळे डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे, सकस आहार न घेतल्याने किंवा बाहेरील प्रदूषणाने आपल्या चेहऱ्यावर धुळीमुळे आलेला काळपटपणा, केसांची चमक नाहीशी होणे आणि केस गळू लागणे; बापरे! केवढ्या त्या तक्रारी. मात्र एवढ्या सर्व समस्यांवर एक अतिशय सोपा आणि घरगुती उपाय भाज्यांच्या टोपलीत दडलेला आहे. तो म्हणजे बटाटा. आपल्याला इन्स्टाग्राम या सोशल मीडिया वरून @click4su या अकाउंटने या बटाट्याचा उपयोग चेहरा आणि केसांसाठी कसा करायचा हे सांगितलं आहे. काय आहेत या 6 टिप्स पाहा.

हेही वाचा : केस गळतायत.. वजन वाढतेय.. काय करायचे म्हणून प्रश्न पडलाय? आहारात भर घाला फक्त ‘या’ पदार्थाची….

१. डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी

बटाटा सोलून त्याच्या चकत्या कापून घ्या. काहीवेळासाठी या चकत्या फ्रिजमध्ये ठेऊन, नंतर आपल्या डोळ्यांवर ठेवावे. यामुळे नैसर्गिकरित्या डोळ्याखालील काळी वर्तुळे जाऊन, डोळ्यावरील सूज कमी करण्यास मदत होते.

२. केसांचे गळणे कमी करण्यासाठी

बटाट्याचा रस आणि कोरफडीचा गर व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता हे मिश्रण आपल्या केसांच्या मुळाशी लावून डोक्याला मसाज करावा. नंतर केस कंगव्याने शेवटपर्यंत व्यवस्थित विंचरून घ्यावे.

३. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी

बटाट्याचा रस आणि मध व्यवस्थित एकत्र करून त्याचे एक मिश्रण बनवावे. हे मिश्रण ब्रशच्या साहाय्याने चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवून नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

४. केसांची चमक वाढवण्यासाठी

बटाटा आणि त्याची सालं तासभर पाण्यात उकळून घ्या, आता बटाटे बाजूला काढून त्याचे केवळ पाणी एक भांड्यात काढून घ्या. हे पाणी गार झाल्यानंरतर, याने तुमचे केस धुवून घ्या. यामुळे केसांना चमक येण्यास मदत होईल.

५. त्वचा उजळवण्यासाठी

एखादा टिशू पेपर बटाट्याच्या रसामध्ये भिजवून आपल्या चेहऱ्यावर काही मिनिटांसाठी लावून ठेवावा. यामुळे चेहऱ्याला आराम मिळून, त्वचा उजळण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा : हिवाळ्यात आंघोळ करताना ‘या’ पाच गोष्टींकडे लक्ष द्या; पाहा त्वचा मुलायम अन् तुकतुकीत ठेवण्यासाठी या टिप्स….

६. त्वचेवरील मुरुमं घालवण्यासाठी

चेहऱ्यावरील मुरुमं घालवण्यासाठी, कान साफ करण्याची क्यू-टीप [कापसाचे इयरबड्स] बटाट्याच्या रसात बुडवून थेट मुरुमांवर लावावे. किंवा चेहऱ्याला टोनर लावता त्याप्रमाणे सर्व चेहऱ्यावर बटाट्याचा रस कापसाने लावू शकता.

@click4su या इन्स्टाग्राम अकाउंटने शेअर केलेल्या या घरगुती सौंदर्य टिप्सना आजपर्यंत ५.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiny hair to bright and clear skin use potato as a home remedy check out these 6 beauty tips dha