Shiv Jaynati 2022 Messages In Marathi: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र शासनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. या खास दिनाच्या शुभेच्छाही खास असायला हव्यात म्हणून हे शुभेच्छा मेसेज, संदेश तुमच्यासाठी…
१. अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज<br>यांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!!
२.माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
(हे ही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022: जाणून घ्या! छत्रपती शिवाजी महाराज जयंती विषयी…)
३.आम्ही त्यांच्या पुढे होतो नतमस्तक
ज्यांच्यामुळे आज आहे आमचं अस्तित्व
सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
४. माझ्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही,
माझ्या राजाला रोज पुजाव लागत नाही,
माझ्या राजाला दुध-तुपाचा अभिषेक करावा लागत नाही,
माझ्या राजाला कधी नवस बोलावा लागत नाही,
माझ्या राजाला सोने-चांदीचा साज ही चढवावा लागत नाही,
एवढ असुनही जे जगातील अब्जवधी लोकांच्या
हृदयावर अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
‘छत्रपती शिवाजी महाराज’
५. निधड्या छातीचा,
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय!
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा!!
६.शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे!
जय शिवराय!!
७. मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती.. तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’
सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
८. अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!
९. इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा,
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
१०. जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारे
ते आपले छत्रपती शिवाजी महाराज होते
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
११. प्राणपणाने लढून राजा तुम्हीचं जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुम्हीचं लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुम्हीचं घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुम्हाला कोटी कोटी…!
१२. अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना, शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!
१३. जगातील एकमेव राजा असा आहे
ज्यांनी स्वतःसाठी एकही
राजवाडा महल नाही बांधला
तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज,
हे शिवराय प्रणाम तुम्हाला कोटी कोटी…!
(मेसेज क्रेडीट – सोशल मीडिया)