Shoes Cleaning Tips : पावसाळ्याच्या दिवसांत मुलांचे घाणेरडे शूज स्वच्छ करणे एक कठीण काम असते. यानंतर ते नीट सुकवणे त्याहून कठीण काम. पण, आम्ही तुम्हाला पाण्याशिवाय शूज स्वच्छ करण्यासाठी काही ट्रिक्स सांगणार आहोत.

पावसाळ्यात लहान मुलांचे मातीने खराब झालेले शूज स्वच्छ करणे हे बऱ्याचदा कठीण काम असते. विशेषतः पांढरे शूज साफ करणे म्हणजे एकप्रकारे डोकेदुखीच असते. पाणी आणि साबणाने ते स्वच्छ केले जाऊ शकतात, पण ते कडक सुकणार कसे असा प्रश्न असतो. पण, आता शूज स्वच्छ करण्याचे आणि ते सुकवण्याचे टेन्शन घेऊ नका, कारण आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे शूज न धुता स्वच्छ करून चमकवू शकता.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार

१)पांढरे शूज न धुता कसे स्वच्छ करावे

तुम्ही पांढरे शूज न धुता टूथपेस्टच्या मदतीने स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्हाला शूजवर थोडी पेस्ट लावायची आहे आणि कोरड्या स्क्रबर किंवा ब्रशच्या मदतीने शूज स्क्रब करायचे आहेत. मग शूज ओल्या कपड्याने स्वच्छ करा आणि नंतर पंख्याखाली सुकवत ठेवा. इथे कुठेच पाण्याचा वापर करायचा नाही.

२) बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये व्हिनेगर मिसळा. व्हिनेगरची पेस्ट तयार होईपर्यंत चांगली ढवळत राहा. टूथब्रशच्या मदतीने पेस्ट शूजवर लावा आणि हळूवारपणे स्वच्छ करा. पण, पेस्ट शूजवर काहीवेळ तशीच राहू द्या. यानंतर कापसाच्या मदतीने शूज स्वच्छ करा.

३) साबणाचे पाणी

पांढरे लेदर शूज स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी आणि साबण मिक्स करा. आता साबण आणि पाण्याचे हे तयार मिश्रण संपूर्ण शूजवर टूथब्रशच्या मदतीने लावून लावा. यानंतर शूज ओलसर कापडाने पुसून टाका व शूज पूर्णपणे कोरडे होऊ द्या. पंख्यासमोर ठेवूनही ते सुकवू शकता.

४) लिंबू आणि बेकिंग सोडा

तुम्हाला फक्त बेकिंग सोड्यात थोडे लिंबू घालून घट्ट पेस्ट बनवायची आहे. यानंतर ती शूजवर लावा आणि स्क्रब करा व ओल्या कपड्याने स्वच्छ करा आणि नंतर पंख्यावर वाळवा, अशा प्रकारे तुम्ही तुमचे शूज स्वच्छ करू शकता.