संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसांत अंड्याचे सेवन वाढते. मात्र अंडी खातानाही योग्य काळजी घेतली पाहिजे. अंड्याला सुपरफूड म्हटले जाते. मात्र अंडी योग्यरित्या ठेवणे फार महत्वाचे आहे. कारण अंडी चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास ती खराब होऊ लागतात. अनेकदा लोकांना हेच कळत नाही की अंडी फ्रिजमध्ये ठेवावी की बाहेर. कोणते तापमान अंड्यांसाठी चांगले आहे. सामान्यतः लोकांना असं वाटतं की, अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास जास्त काळ टिकतात. चला तर जाणून घेऊयात अंडी फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे की नाही?
सॅल्मोनेला म्हणजे काय
अंडी व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे, कारण अंड्यांमध्ये “साल्मोनेला” नावाचा जीवाणू असू शकतो जो आरोग्यासाठी हानिकारक आहे. साल्मोनेला हा एक प्रकारचा जीवाणू आहे जो सामान्यतः उबदार प्राणी आणि पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये आढळतो.तो आपल्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. साल्मोनेला बॅक्टेरियाची लागण झालेली अंडी खाल्ल्याने व्यक्तीला उलट्या, जुलाब, ताप, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
अंडी फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का?
अनेक लोकं आठवड्याभराची अंडी आणून फ्रिजमध्ये स्टोअर करतात. अंडी फ्रीजमध्ये ठेवणं योग्य आहे की नाही? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर हो योग्य असं आहे. अंडी फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे मात्र त्याचा कालावधीही लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा अंडी रेफ्रिजरेट केली जातात तेव्हा त्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यक आहे. अंडी रेफ्रिजरेटरच्या बाहेर जास्त वेळ ठेवल्यास त्यावर बॅक्टेरिया बसण्याची, अंडी दूषित होण्याची शक्यता वाढते. अंडी अर्धा तास किंवा एका तासाहून अधिक काळ बाहेर ठेवल्यास दूषित होण्याची शक्यता वाढते. योग्य तापमानात अंडी साठवणे खूप महत्वाचे आहे. थंड तापमान आणि योग्य हाताळणी साल्मोनेला बॅक्टेरियाचा प्रसार थांबवतात आणि अंडी सुरक्षित ठेवतात. अंड्यांद्वारे होणारा साल्मोनेला संसर्ग योग्य साठवणुकीमुळे टाळता येतो.
फ्रीजमध्ये अंड कसे ठेवायचे ते जाणून घ्या
रेफ्रिजरेटरमध्ये खोलीच्या तपमानानुसार, म्हणजेच सुमारे ४ अंश सेल्सिअसमध्ये अंडी ठेवणे चांगले आहे. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली अंडी साधारणपणे ३ ते ५ आठवडे ताजी राहतात.
हेही वाचा >> ठाण्यात चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भयानक घटनेचा VIDEO व्हायरल
या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी संबंधित आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे