घरातील टॉयलेटच्या स्वच्छतेसाठी ते नियमितपणे फ्लश करत राहणे आवश्यक मानले जाते. पण फ्लश करताना टॉयलेट सीटचे झाकण बंद करावे की उघडे ठेवावे, यावर बहुतांश लोक संभ्रमात पडले आहेत. आज आपण याविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोलने २०१५ मध्ये एक अपडेटेड रिपोर्ट जारी केला होता. या अहवालात असे म्हटले आहे की जेव्हा तुम्ही टॉयलेट शीट फ्लश करता तेव्हा त्याचे झाकण नेहमी बंद ठेवावे. अन्यथा त्यामध्ये लपलेले विषाणू व जिवाणू बाहेर पसरतात आणि रोगराईचे कारण बनतात.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था

संशोधनानुसार, न्यूक्ली बायोएरोसोल नावाचे विषाणू घाणेरड्या टॉयलेटमध्ये वाढतात. जेव्हा टॉयलेटचे झाकण न लावते फ्लश केले जाते तेव्हा हे लपलेले विषाणू पसरतात आणि नोरोव्हायरस, सार्स आणि इन्फ्लूएंझा यांसारख्या रोगांच्या प्रसारामध्ये मोठी भूमिका बजावतात. टॉयलेट सीटमध्ये लपलेले हे विषाणू केवळ आर्द्रतेतच वाढतात, असे संशोधनात म्हटले आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही झाकण न ठेवता वेगाने फ्लॅश चालवता तेव्हा पाण्याचे काही थेंब बाहेर पडण्याची शक्यता असते.

मंदिरात घंटा वाजवण्याचे खरे कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या याची वैज्ञानिक बाजू

अशा परिस्थितीत, हे विषाणू शौचालयातून बाहेर पडतात आणि श्वासोच्छवासाद्वारे किंवा इतर मार्गाने तुमच्या शरीरात प्रवेश करून तुम्हाला आजारी बनवू शकतात. त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही टॉयलेट साफ केल्यानंतर फ्लश चालवता तेव्हा त्याचे झाकण बंद करा.

मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. जेनेट हिल सांगतात की, मानवी विष्ठा आणि लघवी टॉयलेट शीटमध्ये जातात. या दोन्हीमध्ये लाखोंच्या संख्येने जीवाणू असतात. यातील बहुतांश जीवाणू फ्लशिंगमुळे वाहून जातात. असे असूनही, काही जीवाणू तुमच्या टॉयलेट सीटला चिकटून राहतात. त्यांना दूर करण्यासाठी, ही शीट नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. परंतु फ्लश चालवण्यापूर्वी, शीटचे कव्हर बंद करणे आवश्यक आहे.

जाणून घ्या Heart Attack च्या वेळी नेमकं काय होतं

त्या सांगतात, एखाद्या व्यक्तीच्या विष्ठेतील आणि लघवीतील बॅक्टेरियामुळे आजारी पडण्याची शक्यता फारच कमी असते, परंतु इतर लोकही त्या शौचालयाचा वापर करत असतील, तर संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे उलट्या, जुलाब, ताप, कॉलरा, जुलाब असे आजार होऊ शकतात. याच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागेल.

Story img Loader